हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या (In the Ministry of Textiles) अंतर्गत वस्त्रोद्योग समितीत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे संधी दिली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही भरती मुलाखत पद्धतीने होणार आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी संपूर्ण बातमी वाचा.
रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता
या भरती प्रक्रियेत प्रकल्प सहयोगी (सल्लागार), प्रकल्प सहाय्यक (ज्युनियर सल्लागार), आणि तांत्रिक अधिकारी अशा पदांसाठी निवड होणार आहे. एकूण 10 रिक्त पदे भरली जात असून, निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वेतन
उमेदवारांनी बी.ई./बी.टेक (टेक्सटाईल) किंवा बी. / बीएफ टेक. ही पदवी प्राप्त केलेली असावी.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50,000 ते 70,000 रुपये मानधन दिले जाणार आहे.
निवड प्रक्रिया आणि मुलाखतीचे ठिकाण
ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खालील ठिकाणी उपस्थित राहावे
पत्ता – आरएसए, दुसरा मजला, वस्त्रोद्योग समिती, (भारत सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालय), पी. बाळू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई-400025
मुलाखतीची तारीख – 24 मार्च 2025
अधिक माहिती कोठे मिळेल?
या भरती प्रक्रियेबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी वस्त्रोद्योग समितीच्या https://textilescommittee.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
दरम्यान, कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय ही मुलाखत घेतली जणार आहे. तसेच, टेक्सटाईल क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत काम करण्याचे संधी मिळेल. तसेच उच्च वेतन देखील दिले जाईल.