Job Requirement| सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. नुकतीच आधार सेवा केंद्राने (Aadhar Seva Kendra) आधार ऑपरेटर आणि पर्यवेक्षक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती देशातील 23 राज्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
पात्रता (Job Requirement)
या भरतीअंतर्गत आधार ऑपरेटर आणि पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी किंवा 10 वी उत्तीर्ण केली असावी. तसेच, 2 वर्षांचा ITI कोर्स किंवा 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. यासह, उमेदवारांकडे UIDAI द्वारा प्रमाणित एजन्सीकडून आधार ऑपरेटर किंवा पर्यवेक्षकाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर, उमेदवारांकडे संगणक हाताळण्याचे मूलभूत ज्ञान असावे. (Job Requirement) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी CSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीची संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
भरती प्रक्रियेचे स्वरूप आणि वेतन
लक्षात घ्या की, ही भरती एका वर्षाच्या करारावर केली जात आहे. यासह उमेदवाराचे वेतन राज्य सरकारच्या मानकानुसार निश्चित केले जाईल. अंदाजे निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला सुमारे 21000 रुपये पगार दिला जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची तारीख
आधार ऑपरेटर आणि पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज CSC च्या अधिकृत वेबसाइटवरूनच स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2025 पूर्वी अर्ज भरावा. उशिरा भरण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.