Job Requirement: भारतीय सैन्य अकादमीत या पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Job Requirement
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Job Requirement| सध्या सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी फायदेशीर ठरू शकते. कारण की, भारतीय सैन्य अकादमी (IMA), देहरादूनने असिस्टंट प्रोफेसर आणि एसोसिएट प्रोफेसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमुळे तरुणांना विविध विषयांमध्ये अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळणार आहे.

पदांची माहिती आणि पात्रता (Job Requirement)

IMA मध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि एसोसिएट प्रोफेसर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांकडे संबंधित विषयात मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच, असिस्टंट प्रोफेसर पदासाठी UGC किंवा CSIR NET परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशनचा संदर्भ घ्यावा.

पगार किती असेल?

असिस्टंट प्रोफेसर: 31,500 प्रति महिना

एसोसिएट प्रोफेसर: 40,000 प्रति महिना

ही भरती कंत्राटी पद्धतीने (Contractual) केली जाणार असून उमेदवारांना 11 महिन्यांसाठी नियुक्त केले जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर किंवा ईमेलद्वारे अर्ज पाठवावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अधिकृत नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आली आहे.

ईमेल पत्ता: imaac2019@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
प्राचार्य, ए.सी.सी. विंग,
भारतीय सैन्य अकादमी,
देहरादून-248007

निवड प्रक्रिया आणि मुलाखत

उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज छाननीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. अंतिम निवडीनंतर उमेदवारांना संबंधित पदावर नियुक्त करण्यात येईल.

दरम्यान, ही भरती (Job Requirement)प्रक्रिया भारतीय सैन्य अकादमीमार्फत राबवली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानुसार अर्ज करावा. या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय सैन्य अकादमीत अध्यापन करण्याची संधी मिळेल. त्यामुळे इच्छुकांनी त्वरित आपले अर्ज सादर करावेत.