Job Vacancy | पुढील 3 महिन्यात भारतात होणार बंपर भरती; अनेक कंपन्यांनी घेतला सकारात्मक निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

JOb Vacancy | आपल्या भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. अनेक तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. परंतु या सगळ्या सुविधा आल्या असल्या तरी आजकाल महागाई मात्र मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. एकीकडे ही महागाई वाढत चाललेली आहे, त्याचप्रमाणे दुसरीकडे अनेक क्षेत्रांमध्ये नोकर कपातीचे संकट आलेले आहे. त्यामुळे नोकरीला असलेले देखील अनेक तरुण आता चिंतेत आहे की, जर आपली नोकरी गेली तर कुठे कसे होणार? परंतु आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत कारण पुढील काही महिन्यातच भारतात अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती (JOb Vacancy) होणार आहे.

भारतात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या पुढील तीन महिन्यांमध्ये कर्मचार्‍यांची भरती (JOb Vacancy) करणार आहे. देशातील जवळपास 36 टक्के कंपन्या या पुढील तीन महिन्यांमध्ये नोकर भरती करण्यात करणार आहेत. अशी माहिती समोर आलेली आहे.

पुढील 3 महिन्यात होणार बंपर भरती

भारतीय कंपन्या आता भरती करण्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याची माहिती समोर आलेली आहे. मेन्सपावर ग्रुपने त्यांच्या अहवालात सांगितले आहे की, जून या तीमाहीमध्ये देशातील जवळपास 36 टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्लॅन करत आहेत. जगभरात जागतिक मंदीचं सावट असल्यामुळे अनेक ठिकाणी नोकर कपात होत आहे. परंतु भारतात मात्र सकारात्मक दृष्टीने नोकर भरतीचा निर्णय घेण्यात येणार आहे. जगभरातील 42 देशांमध्ये नोकर भरतीसाठी भारत सर्वात मजबूत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

36 टक्के कंपन्या करणार नोकर भरती | JOb Vacancy

हाती आलेल्या अहवालानुसार 36 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यात नोकर भरती करणार आहे. आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवणार आहेत. देशातील 3150 कंपन्यांच्या निरीक्षणानुसार आता अनेक कंपन्या या नोकर भरती चालू करणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या कालावधीमध्ये 25% कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देखील देणार आहेत. तर 14 टक्के कंपन्या वेतन कपात करण्याच्या विचारात आहे. त्याचप्रमाणे 33% कंपन्यांनी कोणताही बदल करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

भारत इतर देशांच्या तुलनेत अव्वल स्थानावर

केलेले सर्वेक्षणावरून असे लक्षात आलेली आहे की, एप्रिल ते जून 2023 पासून भारताच्या केवळ रोजगारात केवळ 6 टक्के एवढी वाढ झालेली आहे. परंतु ही आकडेवारी मागील तिमाहीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मॅनपावर ग्रुपने असे म्हटले आहे की, कंपन्या 36% एम्प्लॉयमेंट आऊटलूकसह भारत हा देशातील जगभरातील देशांच्या यादीत उच्च क्रमांकवर आहे.

भारताचे रोजगाराचे प्रमाण हे 36 टक्के आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर हे सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. आणि त्यांचे नोकरभरतीचे प्रमाण हे 34% आहे. चीन हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे प्रमाण हे 32 टक्के एवढे आहे.