सचिनचा रेकॉर्ड तोडण्याबाबत जो रूटचे मोठं विधान; पहा नेमकं काय म्हणाला?

Joe Root Sachin Tendulkar (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने (Joe Root) कसोटीत 34 वे शतक झळकावून इंग्लंडकडून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. तसेच रूटने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेट मध्ये 12377 धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट ७ व्या क्रमांकावर असून त्याने ब्रायन लाराला मागे टाकलं आहे. मात्र रूट जर असाच खेळत राहिला तर येत्या काही वर्षात तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकॉर्ड सुद्धा मोडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जो रूट सचिन तेंडुलकरपेक्षा 3544 धावांनी मागे आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 15921 धावा आहेत, तर जो रूटच्या नावावर 12377 धावा आहेत. मात्र जो रुट सध्या ज्या तुफान फॉर्मात आहे आणि ज्या वेगाने धावा करत आहे, ते पाहता जो रूट लवकरच सचिनचा विक्रम मोडेल असे बोलले जात आहे .

लॉर्ड्स कसोटीतील ३४व्या शतकानंतर, जेव्हा जो रुटला विचारण्यात आले की तो सचिनच्या विक्रमाच्या जवळ आला आहे आणि त्याची नजर सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर आहे का, तेव्हा तो म्हणाला, मला फक्त माझ्या संघासाठी खेळायचे आहे. मी संघासाठी योगदान देऊ इच्छितो आणि जास्तीत जास्त धावा करू इच्छितो. शतक झळकावणं ही खूप छान भावना असते, मात्र कसोटीत संघाच्या विजयापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही आणि माझे लक्ष संघासाठी शक्य तेवढे योगदान देण्यावर आहे. यावेळी त्याला ॲलिस्टर कूकचा विक्रम मोडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता रूट म्हणाला, ॲलिस्टर कुकने मला खूप काही दिले आहे. माझ्या कारकिर्दीत त्यांनी खूप साथ दिली.

जो रूटने डिसेंबर २०१२ मध्ये नागपूर येथे भारताविरुद्ध इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले. त्याच्या पदार्पणापासून 2021 पर्यंत, रूट 117 डावांमध्ये केवळ 17 शतके झळकावू शकला होता परंतु 2021 ते 2024 या चार वर्षांपेक्षा रूटने दमदार खेळ दाखवत केवळ 88 डाव खेळताना 17 शतके झळकावली आहेत. सचिन आणि जो रूट यांच्या कारकिर्दीची तुलना करायची झाल्यास,, सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यांच्या 329 डावांमध्ये 51 शतके आणि 68 अर्धशतकांच्या मदतीने 15921 धावा केल्या. तर दुसरीकडे जो रूटने 145 कसोटी सामन्यांच्या 265 डावांमध्ये 34 शतके आणि 64 अर्धशतकांच्या मदतीने 12377 धावा केल्या आहेत. म्हणजेच सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रूटला 3544 धावांची गरज आहे. त्यामुळे त्याला आणखी ३-४ वर्ष क्रिकेट खेळावं लागेल.