पत्रकार, छायाचित्रकार अक्षय मस्के यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पत्रकार, छायाचित्रकार अक्षय उर्फ युवराज संभाजी मस्के यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रेरणा पुरस्कार 2022’ जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे 27 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या 17 व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनामध्ये ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र पत्रकार मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, अध्यक्ष गणेश कोळी, सरचिटणीस बाळकृष्ण कासार यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

पत्रकार अक्षय म्हस्के हे गेले 24 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. त्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून सन 1998-99 पासून सुरुवात केली. प्रथम दैनिक सत्य सह्याद्री, कृष्णा एक्सप्रेस, कर्मयोगी, महासत्ता, महाराष्ट्र टाइम्स, ऐक्य प्रीतीसंगम मुक्तागिरी, लोकमंथन स्वप्नानगरी ग्रामोददार आदी दैनिकात काम केले आहे. सन 2003 मध्ये सुरुवातीला दैनिक सागरमध्ये छायाचित्रकार म्हणून व 2007 पासून आजपर्यंत कराड, सातारा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. पुढे त्यांना लोकमत, पुण्यनगरी, पुढारी वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच ते 1998 ते आजपर्यंत अनेक घडामोडी, घटना, महापूर, दुष्काळ, राजकीय नेत्यांची दौरे, कार्यक्रम, नुकताच येऊन गेलेला कोरोना महामारीचा काळ अशा अनेक घटनांचे छायाचित्र काढून अनेक मराठी, हिंदी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सध्या अक्षय मस्के हे व्हाईस आॅफ मिडिया या देशपातळीवरील संघटनेमध्ये प्रसिध्दी प्रमुख या पदावर जिल्हा कार्यकारणी संघटनेत काम पहात आहेत.

तसेच त्यांनी आतापर्यंत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून विविध स्तरातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. शिवाय त्यांनी विविध संस्था व संघटनांसाठी प्रसिद्धी प्रमुख म्हणूनही उत्कृष्ट उत्कृष्टरित्या काम केले आहे. पत्रकारीते सोबतच त्यांनी आपला ट्रेकिंग व निसर्ग पर्यटनाचा छंदही जोपासला असून त्यासाठी ते इतरांनाही नेहमी प्रेरित करतात. कोरोना कालावधीतही त्यांनी कोरोना बाधित रुग्णांसह इतरांना मोलाची मदत केली. त्याच्या या कार्याची ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र पत्रकार मित्र संघटनेने दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. अक्षय मस्के यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कराडसह सातारा जिल्ह्यातील पत्रकार, विविध पत्रकार संघटना, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांसह कराड दर्शन शिवराय ट्रेकिंग सायकलिंग ग्रुपकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.