रोहित शर्माला कर्णधारपदावरूनच नव्हे तर संघातूनही बाहेर काढा; माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा Rohit Sharma0 हा भारताच्या क्रिकेट इतिहासातील यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. रोहित शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि कल्पक नेतृत्वाच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत तसेच २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. रोहित शर्माच्या या कामगिरीमुळेच यंदाच्या टी-20 वर्ल्डकप मध्ये रोहित शर्माला भारताच्या कर्णधारपदी कायम ठेवण्यात आलं आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) माजी संचालक जॉय भट्टाचार्य (Joy Bhattacharya) यांनी रोहित शर्मा बाबत वेगळंच मत व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे. रोहित शर्मा T20 फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी आदर्श पर्याय नाही तसेच रोहित सध्या फॉर्ममध्ये नाही असेही त्यांनी म्हंटल. ते क्रिकबजच्या एका शोमध्ये बोलत होते

जॉय भट्टाचार्य म्हणाले, मला रोहित शर्माबद्दल खूप आदर आहे आणि मला वाटते की तो एक चांगला क्रिकेटर आहे. परंतु तरीही टी-20 वर्ल्डकप मध्ये रोहित शर्मा संघाचा कर्णधार झाल्यास अडचणी वाढतील. विराट कोहली, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि भारताच्या सलामीवीरासाठी प्रबळ दावेदार आहेत. परंतु रोहित शर्मा कर्णधार असल्याने तोच सलामी देईल, आणि त्यामुळे या तिन्ही मधील एका फलंदाजाला खालच्या क्रमांकावर खेळावं लागेल. रोहित शर्मा हा फॉर्मात नाही, परंतु तो कर्णधार असल्याने यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल किंवा विराट कोहली यांच्यातील एकाला बाहेर काढावे लागेल.

भट्टाचार्य यांनी भारताच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्माच्या ऐवजी यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहची निवड केली. ते म्हणाले, ‘मी रोहित शर्मापेक्षा जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड करेन कारण बुमराहचे गोलंदाज म्हणून कौशल्य त्याला संघाचा महत्त्वाचा सदस्य बनवते. भट्टाचार्य यांच्या या विधानानंतर माजी दिग्गज क्रिकेटपटू काय मत व्यक्त करतात ते पाहायला हवं. एकीकडे संपूर्ण देशात रोहित शर्माच्या नेतृत्वाचे कौतुक होत असताना जॉय भट्टाचार्य यांनी रोहित शर्माबाबत केलेल्या विधानाने चर्चाना उधाण आलं आहे.