India’s Costliest Apartment : ‘या’ व्यक्तीने खरेदी केले भारतातील सर्वात महागडे घर, एका अपार्टमेंटसाठी मोजले चक्क 369 कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India’s Costliest Apartment : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोणत्याही खास ओळखीची गरज नाही. याच मुंबईला मायानगरी असेही म्हंटले जाते. आता याच मायानगरीतून एक बातमी समोर आली आहे. कारण इथे एक अपार्टमेंट चक्क 369 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहे. ज्यानंतर ते देशात विकले गेलेले हे सर्वात महागडे घर ठरले आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात हे लक्झरी ट्रिपलेक्स अपार्टमेंट खरेदी करण्यात आले आहे. या अपार्टमेंटच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला हँगिंग गार्डन्स आहेत. गर्भनिरोधक उत्पादने बनवणाऱ्या फॅमी केअरचे संस्थापक JP Taparia यांनी ते अपार्टमेंट विकत घेतले आहे. यासाठी त्यांनी तब्ब्ल 19.07 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

India's costliest apartment! JP Taparia buys triplex worth Rs 369 cr in  Mumbai's Malabar Hill - BusinessToday

लोढा मलबार या सुपर-लक्झरी रेसिडेन्शिअल टॉवरचा हा अपार्टमेंट एक भाग आहे. जे 26व्या, 27व्या आणि 28व्या मजल्यावर आहे. लोढा टॉवर वाळकेश्वर रोडवर गव्हर्नर इस्टेटच्या समोर आहे. जेपी तापडिया यांनी विकत घेतलेल्या या अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. जे 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याआधी बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी देशातील सर्वात महागडे घर खरेदी केले होते. त्यांनी देखील त्याच टॉवरमधील पेंटहाऊससाठी 252.50 कोटी रुपये मोजले होते. India’s Costliest Apartment

India's Most-Expensive Apartment Deal: J P Taparia Buys Triplex In South  Mumbai For Rs 369 Crore

19.07 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी

हे अपार्टमेंट एकूण 27,160 स्क्वेअर फूट असून 1.36 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने हा करार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रति चौरस फूट आधारावर हा देशातील सर्वात महाग निवासी करार ठरला आहे. बुधवारी सायंकाळी अपार्टमेंटचे रजिस्ट्रेशन झाले. यावेळी 19.07 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरण्यात आले आहेत. लोढा ग्रुपची लिस्टेड कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सद्वारे बांधण्यात येत असलेला लोढा मलबार हा लक्झरी टॉवर एकूण 1.08 एकरमध्ये पसरलेला आहे. India’s Costliest Apartment

Ananta Capital | The Perpetual Capital Partners

JP Taparia बाबत जाणून घ्या

JP Taparia हे फॅमी केअर या गर्भनिरोधक उत्पादन कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांचे अनंत कॅपिटल, स्प्रिंगवेल आणि गार्डियन फार्मसीमध्येही स्टेक आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये, तापडिया कुटुंबाने आपला आईकेयर बिझनेस 2,460 कोटी रुपयांमध्ये वायट्रिस इंकला विकला. तापडिया यांनी 2015 मध्येही 4,600 कोटी रुपयांमध्ये मायलनला त्यांचा वूमेन हेल्थकेयर बिझनेस विकला होता. अशा प्रकारे आपले दोन व्यवसाय विकून त्यांना 7,000 कोटींहून जास्तीचीच रक्कम मिळाली. India’s Costliest Apartment

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :

हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल