बालकांमधील स्थूलपण्याच्या लढ्यासाठी जेटी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम ; मुलेच होणार ब्रेण्ड अम्बेसीडर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | अलीकडील काळात स्थूलपणा चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थूलपणा ही केवळ भारतीयांची समस्या नसून संपूर्ण जगाची आहे. त्यामध्ये चीन देश अग्रेसर आहे. जगभरातील स्थूलव्यक्तींमधे चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो. स्थुलपणाचे मुख्य कारण जंकफ़ूड हे असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. लहान मूलांमध्ये जंकफ़ूड खाण्याचे प्रमाण वाढले असून त्याबाबत जनजागृती साठी मोठी चळवळ जेटी फाउंडेशनने हाती घेतले आहे.

जेटी फाउंडेशनच्या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ़ कोरेगाव पार्क, अपोलो हॉस्पिटल, ओ क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल व नवनीत प्रकाशन यांचं विशेष सहकार्य लाभल आहे. विविध शाळांच्या माध्यमातून ( महानगरपालिका, सेमी इंग्रजी ) सर्व मिळून जिल्ह्यातील ४५ शाळांनी नोंदणी केल्याचे डॉ जयश्री तोड़कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

सदर चळवळ डॉ तोड़कर यांनी १५ वर्षापूर्वी सुरु केली. ही चळवळ उभारणाऱ्या त्या आशियातील पहिल्या महिला आहेत. या जीवघेण्या आजाराचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी यासाठी काम करावयाचे ठरवले आहे. या पूर्वी १६ नोव्हे २०१७ रोजी उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृतीचा उपक्रम
एकूण १५,००० चित्रांपैकी १०० हुन अधिक चित्रांची निवड करून त्याचे प्रदर्शन भरवण्याचा मानस आहे. तसेच त्या चित्रांना १२ ऑगस्ट रोजी महात्मा फुले सभागृह, फातिमानगर येथे आयोजित कार्यक्रमात बक्षिस देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. शिवाय लट्ठपणा जनजागृती दूत घोषित केले जाईल अशी माहिती जेटी फाउंडेशन चे प्रमुख डॉ जयश्री तोड़कर यांनी दिली दिली.

दोन गटात होणार ही स्पर्धा

  • इयत्ता पाचवी ते सातवी ‘ अ ‘
  • गटइयत्ता आठवी ते दहावी ‘ ब ‘ गट

Leave a Comment