नवी दिल्ली वृत्तसंस्था:सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ 23 एप्रिलला संपल्याने सर्वोच्च न्यायालयाने सर न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा यांची देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एन.व्ही. रमणा हे देशाचे 48 वे सरन्यायाधीश असणार आहेत.
Delhi: Justice NV Ramana takes oath as the new Chief Justice of India (CJI). He was administered the oath by President Ram Nath Kovind, at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/jDESeLZh2D
— ANI (@ANI) April 24, 2021
शेतकरी पुत्र ते सरन्यायाधीश…
एन.व्ही. रमणा मूळचे आंध्र प्रदेशाच्या पोन्नवरम गावचे याच ठिकाणी त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 ला झाला. त्यांचे आई वडील शेती करत होते. 1983 रोजी त्यांनी स्वतःची वकील म्हणून नोंदणी केली. आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सराव सुरू केला त्यांना 27 जून 2000 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पर्मनंट न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. 2 सप्टेंबर 2013 रोजी त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करण्यात आले. 17 फेब्रुवारी 2014 रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी उत्तर अधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही.रमणा यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली होती.