हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jyoti Malhotra । हरियाणाची युट्यूबर आणि पाकिस्तानसाठी जासूसी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची सिक्रेट डायरी पोलिसांच्या हाती लागली असून त्यातून काही खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्योती मल्होत्राच्या डायरीच्या माध्यमातून तिने आतापर्यंत कुठे, कुठे प्रवास केलाय याबाबत माहिती मिळत आहे. कोणत्याही देशात जाण्यापूर्वी ती संपूर्ण अभ्यास करायची आणि त्या देशाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती तिच्या डायरीत लिहून ठेवायची. परंतु ज्योतीच्या डायरीत पोलिसांना अशी एक गोष्ट आढळून आली आहे, ज्यामुळे सर्वच चक्रावून गेले आहेत.
पाकिस्तान बद्दल काय लिहिले – Jyoti Malhotra
ज्योती मल्होत्राच्या (Jyoti Malhotra) डायरीत ‘आय लव्ह यू’ असं लिहिले होते. मात्र ज्योतीने कोणासाठी I Love You लिहिलं आहे याचा उलगडा मात्र डायरीत नाही. तिच्या डायरीत असेही लिहिले होते की मी लवकरच येईन. ज्योतीच्या डायरीतील ३ पाने हि पाकिस्तानवर आहेत, ८ पाने इंग्रजी मधून लिहिली आहेत. ज्योतीने पाकिस्तानबद्दल लिहिले आहे… मी १० दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर माझ्या देशात म्हणजेच भारतात परतली आहे. या काळात मला पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळाले. सीमांमधील अंतर किती काळ राहील हे मला माहित नाही, पण हृदयातील तक्रारी दूर केल्या पाहिजेत. आपण सर्व एकाच मातीचे आहोत. मी पाकिस्तान सरकारला विनंती करते की त्यांनी भारतीयांसाठी अधिक गुरुद्वारा आणि मंदिरे उघडावीत आणि अशा सुविधा निर्माण कराव्यात जेणेकरून हिंदू लोकही तिथे जाऊ शकतील असं ज्योतीने तिच्या डायरीत लिहिलं आहे.
ज्योती मल्होत्राच्या डायरीत महाभारत, रामायण, ब्राह्मण, क्षत्रिय, इ.स., रझिया सुलतान, कुतुबमिनार हे शब्द सुद्धा आहेत. याशिवाय काही औषधांचाही उल्लेख डायरीत आहे. ज्योतीने तिच्या बाली इंडोनेशियाच्या सहलीचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि तिच्या डायरीत लाखो रुपये खर्च झाल्याचे नमूद केले होते. ज्योती मल्होत्राला १६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ज्योतीला न्यायालयात हजर केले आणि तिला ५ दिवसांच्या रिमांडवर घेतले. पोलिस सध्या ज्योतीच्या लॅपटॉप आणि मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी करत आहेत. तसेच, व्यवहार, सहलीचे तपशील आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, पोलीस तपासात ज्योती मल्होत्राचे हाफिज सईद कनेक्शन सुद्धा समोर आलं आहे. लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचे घर ज्याला म्हंटल जाते त्या मुरीदकेमध्ये ज्योतीने तब्बल १४ दिवस हेरगिरीचे प्रशिक्षण घेतलं होत. हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योतीने याची कबुलीही दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र चौकशीदरम्यान ती मुरीदकेहून कोणत्या मोहिमेवर भारतात परतली होती हे स्पष्ट होऊ शकले नाही. या मोहिमेत तिच्या शिवाय आणखी किती लोक आहेत? या संदर्भात हिसार पोलिस चौकशी करत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे तेच मुरीदके आहे जिथे हजारो दहशतवादी घडवले गेले आहेत. मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबनेही याच मुरीदके मध्ये प्रशिक्षण घेतलं होते.