महागड्या रिचार्जवर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उत्तराने नेटकरी भडकले; नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील महिण्यापासून एअरटेल, जिओ यांसारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या (Mobile Recharge Plan) किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेला देशातील सर्वसामान्य माणूस आता मोबाईल रिचार्जच्या किमतींमुळे हैराण झाला आहे. रिचार्ज महाग झाल्याने अनेक यूजर्स आता देशी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळत आहेत. तसेच AIRTEL आणि JIO बायकॉट चा ट्रेंडहि सुरु आहे. एकीकडे हे सगळं असं वातावरण असताना दुसरीकडे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया( Jyotiraditya Scindia) यांनी रिचार्जच्या महागड्या किमतीवरून संसदेत दिलेल्या उत्तराने नेटकरी आणखी भडकले आहेत. सिंधिया यांनी थेट आकडेमोड दाखवत संसदेत सांगितले की, संपूर्ण जगात मोबाईल कॉल आणि इंटरनेट सर्वात स्वस्त असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, भारतातील मोबाईल कॉल रेट (Mobile Call Rate) संपूर्ण जगात सर्वात कमी आहे. भारतातील कॉल दर 53 पैसे प्रति मिनिट आहे, जो सध्या 3 पैशांनी कमी करण्यात आला आहे. अशाप्रकारे कॉल दर 93 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे कॉलिंग करणे पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहे. 1 जीबी डेटाची किंमत भारतात सर्वात कमी असल्याचे सुद्धा त्यांनी म्हंटल. सिंधिया यांच्या या उत्तराने नेटकरी आणखी भडकण्याची शक्यता आहे. कारण रिचार्ज दरवाढीचा त्रास हा सर्वांनाच भोगावा लागत आहे.

रिपोर्टनुसार, भारतात 1 GB डेटाची किंमत 9.12 रुपये आहे. भारतात 117 कोटी मोबाइल वापरकर्ते आहेत, तर 93 कोटी जनता इंटरनेट चा वापर करते. 2022 च्या डेटाचा विचार केला तर भारतात एकूण 141.72 कोटी युजर्स आहेत. म्हणजे देशातील बहुतांश नागरिक मोबाईल वापरातत. देशातील 6,44,131 गावांमध्ये 298 दशलक्ष ग्राहक आहेत. यापैकी 6,12,952 गावांमध्ये 3G आणि 4G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. आकडेवारीनुसार, देशातील ९५.५ टक्के गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. मोबाईल आला म्हंटल कि त्याला रिचार्ज तर करावा लागतच आहे. मात्र त्याच रिचार्जच्या किमती महाग झाल्याने सर्वसामान्य जनतेला मोठी आर्थिक झळ बसत आहे.