सातारा | अमित येवले
कास पुष्प पठार आता विविधरंगी नैसर्गिक फुलांनी बहरत असून वन विभागाने हे पुष्पपठार पर्यटकांसाठी सोमवारपासून खुले केले आहे.
शनिवार आणि रविवारी (सुट्टीच्या दिवशी) कास पठारावर जाण्यासाठी ऑनलाईन बुकींगही संकेतस्थळावरुनच करुन यावे लागणार आहे. इतर दिवशी इथे तिकीट उपलब्ध असणार आहेत.
कास पठार हे सौंदर्याची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून ते समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याची नवी पर्यटनाची ओळख म्हणून हे ठिकाण पुढे येत आहे.
बुकिंग वेबसाइट –
http://www.kas.ind.in
पर्यटकांसाठी अधिक
★ प्रवेश शुल्क – 100/-
★ 12 वर्षाखालील व 65 वर्षावरील लोकांना फी नाही.
★ सोबत वय ओळख पटावी म्हणून कुठलेही शासकीय ओळखपत्र आणावे.
★ ३ हजार व्यक्तींना दररोज प्रवेश.