‘बाबा चलाना घरी’, शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कैलास पाटलांकडे लेकीचा हट्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (kailas patil) यांनी राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाच्या समर्थनात उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्हा बंदचे आव्हान केले आहे. खासदारांच्या या आव्हानाला उस्मानाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळला आहे. या आंदोलनादरम्यान आमदार कैलास पाटील (kailas patil) यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची मुलगी आणि पुतणी आंदोलन स्थळावर आल्या होत्या. यामुळे त्या ठिकाणचे वातावरण भावनिक झाले होते.

आमदार कैलास पाटील याचं बळीराजासाठी आंदोलन
माझ्या उपोषणामुळे जर शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार असतील तर मी हे उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे पाटील (kailas patil) यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतरच मी उपोषण थांबवेल असेदेखील कैलास पाटील म्हणाले. काल एका दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यांच्या विश्वास नाही असे नाही पण प्रशासकीय कारवाईत दिरंगाई होत आहे. माझ्यामुळे जर शेतकऱ्यांना एक दोन दिवस लवकर पैसे मिळणार असतील तर उपोषण सुरुच ठेवणार असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलं.

आंदोलन स्थळावरचे वातावरण झाले भावनिक
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषण स्थळी त्यांची मुलगी आराध्या व पुतणी राजेश्वरी ह्या आल्या त्यानंतर एक भावनिक वातावरण झाले होते. मुलगी व बापाचे नाते किती घट्ट असते हे यावेळी लोकांना पाहायला मिळाले. आंदोलनातून चला असे म्हणत या दोघींनी अनेक वेळा आमदार पाटील (kailas patil) यांचे हात ओढले त्यानंतर गळयात पडून गालावर पपीसुद्धा घेतली. बाप आणि लेकीचे हे नाते पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय