हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kailash Parvat Mystery) संपूर्ण जगभरात अनेक रहस्य दडलेली आहेत. यातील कित्येक रहस्य अशी आहेत ज्यांच्यासमोर विज्ञानही फेल ठरतं. ज्यामध्ये देवांचे देव महादेव यांचे स्थान असणाऱ्या कैलास पर्वताचा समावेश आहे. माहितीनुसार, माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. त्याच्यासमोर कैलास पर्वताची उंची सुमारे २ हजार मीटर कमी आहे. असे असूनही आजपर्यंत कोणताही मनुष्य कैलास पर्वत सर करू शकलेला नाही.
हिंदू तसेच बौद्ध धर्मात या पर्वताला पवित्र दर्जा आहे. त्यामुळे कैलास पर्वताबाबत प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न आहेत. आतापर्यंत अनेकांनी कैलास पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रत्येकाला अपयश आलं. असं का होत असेल? यामागे नेमकं काय रहस्य दडलंय? चला जाणून घेऊया.
रहस्यमयी कैलास पर्वत (Kailash Parvat Mystery)
कैलास पर्वत हा तिबेटच्या नैऋत्य कोपऱ्यात आहे. बलाढ्य हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या पर्वताकडे जाण्यासाठी भारतातून उत्तराखंडमार्गे जावे लागते. हिंदू पुराणे तसेच ग्रंथांनुसार कैलास पर्वतावर महादेव वास करतात. त्यामुळे हिंदू धर्मीयांमध्ये कैलास पर्वत अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे. असे असूनही आजपर्यंत कोणतीही व्यक्ती ट्रेकर असली तरीही कैलास पर्वत सर करू शकलेली नाही, हे थोडे विशेष आहे. तसा अनेकांनी प्रयत्न केला होता.
मात्र, बऱ्याच लोकांना या पर्वतावर चढाई करताना नेव्हिगेशन करणे अवघड असल्याचे समजले. (Kailash Parvat Mystery) या पर्वतावर म्हणजे दिशा भरकटते, रस्ता चुकतो. अनेकांनी याबाबत अलौकिक शक्तीमुळे येथे दिशानिर्देश बदलत असल्याचा दावा केला आहे.
अलौकिक शक्तींमुळे तयार झालेले स्थान
निसर्गातील अद्भुत आणि रहस्यमयी गोष्टींनी समृद्ध असणारा कैलाश पर्वत हा नैसर्गिक रचना नसून अलौकिक शक्तींमुळे तयार झालेला एक पिरॅमिड आहे, असे अनेक संशोधक तसेच तज्ञांचे म्हणणे आहे. हा अद्भुत कैलाश पर्वत १०० रहस्यमयी पिरॅमिड्सपासून बनल्याचा दावा एका रशियन तज्ञाने केला होता. (Kailash Parvat Mystery) आणखी एक खास बाब म्हणजे, कैलाश पर्वत हा इतर कोणत्याही पर्वतांप्रमाणे त्रिकोणी नसून हा पर्वत आकाराने चौकोनी आहे. पुराणानुसार, हा पर्वत सृष्टीचे केंद्र असून या ठिकाणी सोने, माणिक, स्फटिका आणि लॅपिस लाजुली अशा मौल्यवान धातूंचा साठा असल्याचा उल्लेख आहे.
कोणत्याही मनुष्यासाठी अवघड चढाई
कैलास पर्वताचा उतार हा ६५ अंशांपेक्षा जास्त असून हे ठिकाण अत्यंत किरणोत्सर्गी आहे. त्यामुळे सामान्य मनुष्य सोडा, गिर्यारोहकदेखील येथे चढाई करण्यासाठी घाबरतात. अनेकदा येथे हवामानात अचानक बदल होत असतो. त्यामुळे मानवाची प्रकृती बिघडू शकते. शिवाय वातावरणातील बदलांमूळे अनेकदा हेलीकॉप्टरसुद्धा भरकटतात. (Kailash Parvat Mystery) विशेष सांगायचे म्हणजे, हा पर्वत सर करताना चुकीच्या दिशेने वळणे लागून दिशाभूल करणाऱ्या पायवाटा लागतात. अशा कारणांमुळे सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे.
कुणी केली होती शेवटची चढाई?
हिंदू तसेच बौद्ध धर्मीयांसाठी कैलास पर्वत हे एक पवित्र स्थान आहे. येथे अलौकिक शक्ती वास करते. त्यामुळे इथे कोणालाही चढाई करून दिली जात नाही. (Kailash Parvat Mystery) बौद्ध धर्मियांनी केलेल्या दाव्यानुसार, बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा यांनी ११ व्या शतकात कैलास पर्वतावर चढाई केली होती. या त्यांत पवित्र आणि रहस्यमयी पर्वतावर त्यांनी भेट दिल्यानंतर ते पुन्हा जिवंत परतले होते. या पर्वतावर जाऊन जिवंत परतणारे ते जगातील पहिले व्यक्ती असल्याचे बौद्ध धर्मियांचे म्हणणे आहे.
इथे होते मोक्षप्राप्ती
हिंदू, बौद्ध तसेच जैन धर्मीयांमध्ये कैलास पर्वत अत्यंत पवित्र आणि धार्मिक स्थान मानले जाते. हिंदू मान्यता लक्षात घेता कैलास पर्वत हे भगवान शिवशंभू महादेवाचे स्थान आहे. या ठिकाणी मोक्ष प्राप्ती होते, असे मानले जाते. (Kailash Parvat Mystery) तर तिबेटी बौद्ध हे कैलास पर्वताला पृथ्वीवरील बौद्ध विश्वविज्ञानाचा केंद्रबिंदू मानतात. याशिवाय जैन धर्माचे संस्थापक, ऋषभ यांना येथे आध्यात्मिक जागृती मिळाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे तिन्ही धर्मीयांच्या अध्यात्मिक भावना कैलास पर्वतांसोबत जोडलेल्या आहेत.