खाऊगल्ली | उन्हाळ्यात थंड पेय पिण्याची इच्छा सर्वांनाच होते. त्यासाठी कैरीचे पन्हे हा उत्तम पर्याय आहे. तसेच पन्ह्याचा तयार गर हा टिकाऊ असतो, त्यामुळे हा गर बनवून फ्रिजमध्ये ठेवता येतो आणि गरजेनुसार पन्हे पिता येते.
साहित्य –
१) २ कैरी
२) २ कप साखर
३) १ टिस्पून वेलची पूड
कृती –
एक मोठी कैरी कूकरमध्ये शिजवून घ्यावी. कैरी थंड झाली की त्याची साल काढून गर वेगळा करावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
साखर पातेल्यात घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी घालून गोळीबंद पाक करावा. पाक तयार झाला की गॅस बंद करावा. त्यात वेलचीपूड घालावी, कैरीचा गर घालावा. ढवळून घ्यावे. मिश्रण थंड झाले की काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
जेव्हा पन्हे प्यायचे असेल तेव्हा एक ग्लासमध्ये २-३ टेस्पून मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.
( टीप – पन्हे सर्व करताना त्यात आवडीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस घालू शकता. )
इतर पदार्थ –