कालीचरण महाराजांचा पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर येथे सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी कालीचरण महाराज यांनी खळबळ जनक विधान केले. डुकराचा दात रात्र भर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकण्यावर येईल, सर्व भूत प्रेत मंत्र तंत्र बाहेर येईल, असा अजब दावा कालीचरण महाराज यांनी केला.

यावेळी कालिचरण महाराज म्हणाले की, लव्ह जिहादच्या रोजच्या 40 हजार केसेस आहे, दिल्लीत 35 केसेस मुलींच्या आल्या आहेत. मुलीचे वशीकरण करतात, धडग्यावर जे माथा टेकवताय त्यांच्या पोटी भूत जन्माला येतात. तिकडे गेले की तुमच्यात मंत्र-तंत्र होते, त्यासाठी डुकराचा दात रात्र भर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकण्यावर , सर्व भूत प्रेत मंत्र तंत्र बाहेर येईल.

धर्म म्हणजे सनातन धर्म, कोणता ही मौलाना म्हणणार नाही इस्लाम धर्म, त्यांना लहानपणापासून मदारश्यात शिकवले जाते, तुम्हाला काय शिकवले जातात. सर्व आतंकवादी मुस्लिमच आहे, 5 लाख मंदिर फोडली होती, सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर हिंदू राष्ट्र झाल असता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मुस्लिमांनवर विश्वास ठेऊ नका, दरोरोज 1 लाख गोवंश हत्या होते, हिंदू द्वेष करत नाही मात्र हिंदूंच्या मनात द्वेष निर्माण होत आहे, असा दावाही कालीचरण महाराज यांनी केला.