व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नात्याला काळीमा : पतीने पैशांसाठी पत्नीला मित्रासोबत…

फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पती- पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मित्राकडून घर बांधण्यासाठी उसनवार घेतलेले पैसे परत देण्यास नसल्याने फलटण तालुक्यातील एकाने आपल्या पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवायला  भाग पाडले. या घटनेनंतर संबंधित महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला. अखेर पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात बलात्कार, जाचहाट व मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील एका गावातील एकाने घर बांधण्यासाठी मित्र व इतरांकडून हात उसने पैसे घेतले होते. हात उसणे घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे पैसै मागण्यासाठी लोक वारंवार घरी येऊ लागले, ही बाब पत्नीने पतीला सांगितली. तेव्हा पतीने मित्राकडून पैसे घेतलेत, परंतु ते परत देऊ शकत नाही. पैसे द्यायला लागून नये, म्हणून मी उपाय शोधला आहे, असे म्हणत पतीने मित्राबरोबर पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

या नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकाराला पत्नीने प्रतिकार केला असता, तिला दमदाटी करत मारहाण करण्यात आली. याचा गैरफायदा घेत विवाहित महिलेवर वेळोवेळी पतीच्या मित्राने अत्याचार केले. तर दुसरीकडे पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ सुरुच ठेवला. हा सर्व त्रास असह्य झाल्याने पिडीत महिलेने पोलिसात तक्रार दिली. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली असून अधिक तपास सपोनि भोसले करत आहेत.