हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kaliyur Village) स्वयंपाक हि एक कला आहे. जी प्रत्येकाला अवगत असेलच असे नाही. पण ज्याला स्वयंपाक बनवणं जमलं त्याला एखाद्याच मन सहज जिंकता येत. ते म्हणतात ना, ‘दिल का रस्ता पेट से जाता है।’ अगदी तसंच. बहुतेक लोक असं मानतात कि, स्वयंपाक बनवणं हे काम स्त्रियांचं आहे. प्रत्येक घरात जेवण बनवण्याची किंवा विविध अन्नपदार्थ बनवून घरातील मंडळींचा पोटोबा खुश ठेवण्याची जबाबदारी हि याच कारणामुळे गृहिणींवर असते. पण आता पुरुष मंडळींनी हा समज मोडून काढला आहे. आजकाल अनेक पुरुष स्वयंपाकात पटाईत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच काय तर, मोठमोठ्या हॉटेल, रेस्टोरंटमध्ये महिलांपेक्षा जास्त पुरुष स्वयंपाकी आढळतात. त्यांच्या हातचे पदार्थ अनेक खवय्ये अगदी मिचक्या मारत खातात.
(Kaliyur Village) अशा या समाज मान्यतांना मागे सारून पुरुष मंडळी आज फूड इंडस्ट्रीत अग्रेसर दिसत आहेत. काही पुरुष घरातही आपल्या आईला, बहिणीला किंवा पत्नीला स्वयंपाक बनवण्यात मदत करतात. तर काही पुरुषांनी उत्तम पाककलेच्या आधारावर स्वतःचे फूड स्टॉल, हॉटेल सुरु केले आहेत. जगभरात आज असे कितीतरी पुरुष शेफ आहेत. असेच अनेक पुरुष शेफ तुम्हाला एकाच गावात भेटले तर.. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि आपल्या देशात एक असं गाव आहे जिथे स्वयंपाकी तयार केले जातात.
कुठे आहे असं गाव?
देशभरात अशी अनेक ठिकाण आहेत ज्यांना पर्यटन स्थळे म्हणून ओळखले जाते. पण दक्षिण भारतात तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील कलयुर गावाची बातच काही और आहे. या गावात प्रत्येक घरातील पुरुष स्वयंपाकी आहे. त्यांना लहानपणापासूनच पाककलेचे प्रशिक्षण दिले जाते. बऱ्याच स्त्रिया अनेक वर्ष स्वयंपाक करूनही यात पारंगत होऊ शकत नाहीत. मात्र या गावातील पुरुषांवर जणू देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. (Kaliyur Village) म्हणूनच या गावाला ‘आचाऱ्यांचं गाव’ किंवा ‘स्वयंपाकींचं गाव’ म्हणून ओळखलं जातं.
एका वृत्तानुसार, कलयुर गावात नुसता पाय ठेवला तरी वेगवेगळ्या चविष्ट पक्वान्नांचा आणि खमंग फोडण्यांच्या वास येतो. इथल्या पुरुषांनी बनवलेल्या जेवणाची चव अगदी स्वर्गीय सुख देणारी आहे, असेही सांगितले जाते. इथली खासियत सांगायची म्हणजे, येथील प्रत्येक घरात एक उत्कृष्ट स्वयंपाकी आहे आणि येथे २०० सर्वोत्कृष्ट पुरुष आचाऱ्यांची घरं आहेत.
इथे सगळेच पुरुष स्वयंपाकी कसे बनले? (Kaliyur Village)
कलयुर गावातील प्रत्येक पुरुष स्वयंपाकी होण्यामागे एक विशेष कारण सांगितले जाते. सुमारे ५०० वर्षांपूर्वी उच्च दर्जाची मानली जाणाऱ्या रेडदियार जातीची माणसं कलयुरमध्ये वास्तव्यास होती. या जमातीतील सगळेच उद्योगपती होते. त्यांनी घरगुती स्वयंपाकाची जबाबदारी खची जात मानल्या जाणाऱ्या वानियार लोकांना दिली. या लोकांचे पाककृतींचे गुप्त ज्ञान अवगत असल्यामुळे ते स्वयंपाक करण्यात निपुण होते. अगदी ब्राह्मणांपेक्षा उत्तम स्वयंपाक ते करत. (Kaliyur Village) त्यावेळी फार कोणते व्यवसाय नव्हते आणि शेतीतून फारसा नफा होत नसे. त्यामुळे पुरुष मंडळी स्वयंपाकाचा छंद उत्पन्नाच्या हिशोबाने जपू लागले.
इथे स्वयंपाकी होणं सोप्प नाही कारण..
असं म्हणतात कि, कलयुरमध्ये स्वयंपाकी बनणं सोपं काम नाहीये. कारण इथे स्वयंपाकी व्हायचे असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागतं. कलयुरमध्ये मुलांना लहानपणीच पाककलेचं प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली जाते. यात सुरुवातील भाजी कापणे, त्यानंतर शेतातून ताजी फळे आणि भाज्या तोडणे शिकवले जाते. (Kaliyur Village) यासोबत त्यांना विविध प्रकारचे पदार्थ बनवायला शिकवले जाते. या प्रशिक्षणाचा काळ साधारण १० वर्ष इतका असतो. यानंतर स्वयंपाकी स्वतःचा संघ तयार करतो आणि ठिकठिकाणी स्वयंपाक बनवण्याचे काम घेतो.
सुमारे ५०० वर्षांपूर्वी सुरु झालेली ही परंपरा आजही कलयुर गावामध्ये सुरु आहे. कलयुरचे आचारी वर्षभरातील ६ महिने दक्षिण भारतात प्रवास करून विविध जत्रा, लग्न, सोहळे, कार्यक्रमात जेवण बनवण्याचे काम करतात. त्यांची विशेष गोष्ट म्हणजे, स्वयंपाकासाठी त्यांना सर्व आवश्यक साहित्य आपण पुरवल्यास फक्त ३ तासांत हे आचारी हजारो लोकांसाठी अन्न तयार करतात. असे हे कलयुरचे आचारी संपूर्ण दक्षिण भारतात त्यांच्या पाककलेचे प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. (Kaliyur Village)