22 जानेवारीनंतर देशात कलयुग; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन करण्यात येणार असून संपूर्ण देशात रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भाजपनेही राम मंदिराचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला असून या उदघाटन सोहळ्याला देशभरातील ७ हजार मान्यवरांना निमंत्रण पाठवलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते भाजपवर टीका करत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते उदित राज यांनी राम मंदिरावरून भाजपवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. देशात २२ जानेवारी नंतर कलयुग येणार असं त्यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

“1949 ते 1990 या काळात हिंदू महासभा, RSS आणि जनसंघ काय करत होते? असा सवाल करत मंडल आयोग आला नसता तर राम मंदिर बांधले नसते असे उदित राज यांनी म्हंटल. मागासवर्गीय आरक्षणाच्या विरोधात जी ज्योत पेटली होती त्याला अडवाणीजींनीच रथ यात्रा काढून दिशा दिली हे सत्य खरे आहे. हजारो वर्षांपासून दलित खेड्यापाड्याच्या सीमेवर स्थायिक झाले आणि उच्चवर्णीय सावलीनेही अपवित्र झाले, त्याला तलावाचे पाणीही पिऊन देत नव्हते. प्रभू राम-कृष्ण हजारो वर्षे अस्तित्वात होते, पण आमची काय अवस्था होती? असं म्हणत आमचा कलयुग 22 जानेवारीनंतर सुरू होईल असं विधान त्यांनी केलं. दलित वंचित आणि आदिवासींसाठी कलयुय सुरु होईल. सर्व आरक्षण विरोधी लोक राम मंदिराच्या उद्घटनासाठी जात आहेत. इकडे नोकऱ्या संपुष्टात आल्यात, शिक्षण महाग झाले असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, तामिळनाडूचे नेते उदयनीधी स्टालिन यांनीही राम मंदिरावर बोलताना वादग्रत विधान केलं होते. आपण राम मंदिराच्या विरोधात नाही आहोत पण मस्जिद तोडून राम मंदिर उभारण्याच्या विरोधात आहोत असं त्यांनी म्हंटल होते. धर्म आणि राजकारण याना एकत्र आणायचं नाही असं आमचे नेते सांगतात त्यामुळे आम्ही मंदिराच्या विरोधात नाहीच, पण मस्जिद उध्वस्त करून मंदिर बनवलं जात आहे त्याला आमचा विरोध आहे असं उदयनीधी स्टालिन यांनी म्हंटल होत.