हाच का मेट्रो सिटी पुण्याचा विकास; पूरग्रस्त स्थितीवरून कमलताई व्यवहारे यांचा विरोधकांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर पुणे हे यंदाच्या पावसात मात्र समुद्रासारखं पाण्याने भरलेले दिसलं. मागील २-३ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा एकदा पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने पाहायला मिळालं. शहरातील लोहियानगर आणि गंज पेठ परिसरात सुद्धा ओसंडून पाणी वाहू लागलं असून नागरिकांची गैरसोय पाहायला मिळाली. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका पुणेकरांना बसत असून या एकूण सर्व परिस्थितीवरून काँग्रेस नेत्या आणि माजी महापौर कमलताई व्यवहारे(Kamaltai Vyavhare) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हाच का मेट्रो सिटी पुण्याचा विकास? असा सवाल कमलताई व्यवहारे यांनी केला आहे.

मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. गंजपेठ- लोहियानगर या भरगच्च वस्ती असलेल्या भागात सुद्धा[पाणी तुंबल्याने संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. साचलेल्या पाण्याचा मोठा फटका याठिकाणी राहत असलेल्या स्थानिक नागरिकांना बसत असून त्यांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे पुण्याची स्मार्ट सिटी करतो अशा वलग्ना करणाऱ्या विरोधकांवर कमलताई व्यवहारे यांनी हल्लाबोल केला. हाच का मेट्रो सिटी पुण्याचा विकास? एका रात्रीत पावसामुळे पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. असं म्हणत कमलताई व्यवहारे यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

पुण्याच्या पहिल्या महिला महापौर, Kamaltai Vyavahare यांच्या सोबत खास बातचीत । Hello Podcast

कोण आहेत कमलताई व्यवहारे?

कमलताई व्यवहारे या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य आहेत. १९९२ ते २०१७ या काळात त्या नगरसेवक होत्या. कमलताई व्यवहारे यांनी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही भुषवले आहे. पुणे शहरच्या त्या पहिल्या महिला महापौर आहेत. त्या महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसही होत्या. गेली अनेक वर्ष त्या काँग्रेस पक्षासोबत निष्ठेने काम करत आहेत. पुण्यात काँग्रेस वाढवण्यात आणि रुजवण्यास कमलताई व्यवहारे यांचाही मोठा वाटा आहे.