रावणाच्या दहनासाठी आलेल्या कंगनाची मोठी फजिती! करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी संपूर्ण राज्यात दसरा उत्सव आनंदात साजरी करण्यात आला. विशेष म्हणजे, यंदा लव कुश रामलीलामध्ये रावण दहन करण्याचा मान अभिनेत्री करणारा नाव तिला देण्यात आला. मात्र रावण दहन करताना कंगनाची चांगलीच फजिती उडाली. अनेक प्रयत्न केले तरी कंगणाला धनुष्यातून बाण मारता आला नाही. यामुळेच आज तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. तसेच, या प्रसंगामुळे नेटकरी कंगनाची खिल्ली उडवत आहेत.

नक्की काय घडले?

यावर्षी तब्बल पन्नास वर्षानंतर लवकुश रामलीलामध्ये रावण दहन करण्याचा मान एका महिलेला देण्यात आला. ही महीला म्हणजेच कंगना राणावत होती. काल रावण दहनासाठी कंगना दिल्लीतील लाल किल्ला मैदानात ही पोहोचली होती. यावेळी कार्यक्रमात रावणाचे दहन करण्यासाठी कंगनाकडे धनुष्यबाण देण्यात आला. मात्र या बाणाने कंगनाला रावणाचे दहन करता आले नाही. ती जितक्या वेळा प्रयत्न करत होती तितक्या वेळा धनुष्यातील बाण हाच खाली पडत होता. शेवटी तिने देखील हे प्रयत्न थांबवले.

सोशल मीडियावर ट्रोल

सध्या सोशल मीडियावर या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून कंगनाला नेटकऱ्यांकडून टोल करण्यात येत आहे. त्याचबरोबर जर बाण चालवता येत नसेल तर, असे उद्योग का करावे? हिला फक्त आयुष्यात तीर मारता येतात, अशा प्रतिक्रिया कांगणाला या व्हिडिओवर मिळत आहेत. अनेकांनी या व्हिडिओमुळे कंगनाची खिल्ली उडविली आहे. तसेच, तिने पुन्हा असे प्रयत्न करू नये असा सल्ला देखील तिला देण्यात आला आहे.