Kangana Ranaut In Lok Sabha Election : कंगणाला भाजपकडून लोकसभेचे तिकीट; या मतदारसंघातून लढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kangana Ranaut In Lok Sabha Election । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने काल उशिरा आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १११ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. कंगनाची गेल्या काही वर्षांपासून भाजपशी वाढलेली जवळीक पाहता ती लोकसभा लढवणार अशा चर्चा सुरु होत्याच, अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कंगनाने मानले पक्षाचे आभार – Kangana Ranaut In Lok Sabha Election

भाजपने लोकसभेचे तिकीट दिल्यानंतर कंगनाने पक्षाचे आभार सुद्धा मानले आहेत. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करत म्हंटल, माझा प्रिय भारत देश आणि भारतातील जनतेचा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पक्षाने मला नेहमीच बिनशर्त समर्थन दिलं आहे, पाठिंबा दिला आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मस्थानावरून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मी मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत करते.’ मी योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक होण्याचा प्रयत्न करेन. आज मी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला आहे. याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. मी योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक होण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.

दरम्यान, भाजपने आपल्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील ३ नेत्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये सोलापुरातून राम सातपुते, भंडारा- गोंदिया येथून सुनील मेंढे, आणि गडचिरोली चिमूर येथून अशोक महादेवराव नेते यांना तिकीट देण्यात आलं आहे. आपल्या पाचव्या यादीत भाजपने संपूर्ण देशभरात अनेक नव्या चेहऱ्याना संधी दिली आहे.