शिवसेना गमावल्यानंतर ठाकरेंवर कंगनाची सडकून टीका; ट्विट करत म्हणाली की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे गटात चिन्हावरून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर काल केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली आहे. या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कंगनाने ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, “देवतांचा राजा इंद्रसुद्धा दुष्कर्म केल्यावर स्वर्गातून खाली पडतात, मग हा तर फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने माझे घर अन्यायाने तोडले होते, तेव्हाच मला समजलं होतं की लवकरच त्याची सत्ता जाईल, देवता चांगल्या कर्मांनी पुन्हा वर जाऊ शकतात, परंतु स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच पुन्हा वर उठू शकत नाही, आता परत कधीच तो (उद्धव ठाकरे) या परिस्थितीतून वर येऊ शकणार नाही,” असं ट्वीट कंगना राणौतने केलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते. मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले.