व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मोदीजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात; कंगनाच्या शुभेच्छानी वेधले लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे . या निमित्ताने संपूर्ण जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मोदींजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात असं म्हणत तिने मोदींना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा”. लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास किती अविश्वसनीय आहे. मी तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते तुम्ही राम, कृष्ण, गांधींसारखे अमर आहात. या देशाच्या इतिहासाच्या पानात तुमचे नाव सदैव लिहिले जाईल. तुम्ही सर्वांचे लाडके आहात. तुमचा वारसा कोणीही पुसून टाकू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला अवतार मानते, असं म्हणत कंगनाने मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज भाजपकडून देशभर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. याचाच भाग म्हणजे तामिळनाडू राज्यात आज जे बाळ जन्माला येईल त्यांना २ ग्राम सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील एका हॉटेल मध्ये ५६ इंच थाळी ठेवण्यात आली आहे. जी व्यक्ती ही थाळी खाऊन दाखवेल त्याला ८ लाख रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.