हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला आहे. गळ्यात हार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या या व्यक्तीने थेट कन्हैया कुमार यांच्या कानशिलात लावली (Kanhaiya Kumar Slapped), तसेच कन्हैया कुमार यांच्यावर त्याने शाईफेक सुद्धा केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली. यानंतर कन्हैया कुमारच्या समर्थकांनी हल्लेखोराला मारहाण केली.
नेमकं काय घडलं? Kanhaiya Kumar Slapped
याबाबत अधिक माहिती अशी कि, कन्हैया कुमार यांना काँग्रेसनं उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात कन्हैया कुमार स्थानिक आप नगरसेविका छाया शर्मा यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. भेट झाल्यानंतर कन्हैया कुमार कार्यालयातून बाहेर पडत असताना समोर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांना हार घालण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. आधी हार घालून नंतर कन्हैया कुमार यांच्या कानशिलात (Kanhaiya Kumar Slapped) लगावली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
The attack on Congress leader Kanhaiya Kumar was pre-planned. The guy recording the video can be heard saying "Kanhaiya will be beaten up."
— Abhishek (@AbhishekSay) May 17, 2024
The faces of these goons are clearly visible in the video, will @DelhiPolice take any action or do these goons have political protection? pic.twitter.com/De9PoPjyfh
या घटनेनंतर कन्हैया कुमार गाडीत चढला आणि लोकांना आव्हान देऊ लागला. कन्हैयाने भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर निवडणूक हरण्याच्या भीतीने गुंड पाठवल्याचा आरोप केला. भाजप 400 चा आकडा पार करण्याची तयारी करत नाही, तर लोकशाही नष्ट करण्याची तयारी करत आहे. आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना कन्हैया कुमारने व्यक्त केली.