कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटला : बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या 10 वाहनांवर हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील बेळगावचा दौरा करणार होते. मात्र, तत्पूर्वी कर्नाटकमधील बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या 10 वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिक पेटणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील विविध तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आल्या असताना बेळगाव टोलनाक्यावर हिरेबागेवाडी येथे कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला असून मोठे नुकसान करण्यात आले आहे.

संबंधित वाहने पुण्याहून बंगळूरकडे जात होती. यावेळी कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केली. वाहनांच्या काचा फोडत कर्नाटकमध्ये येण्यास विरोध केला. बेळगावात महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर अचानकपणे हल्ला करण्यात आल्याने एकच गोंधळ उडून गेला. तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेचे नारायण गौंडा यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलघेतले असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिकच पेटला आहे.

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये : बसवराज बोम्मई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई कर्नाटकात जाणार होते. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध केला. त्यांनी कर्नाटकात येऊ नये असे सुरुवातीला आवाहन केले. “सध्या कर्नाटकात व बेळगावात वातावरण बरोबर नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्री जर कर्नाटकात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. अशा परिस्थितीत आम्ही कर्नाटकात येणार म्हणणे योग्य नव्हे, असे बोम्मई यांनी म्हंटले आहे.