Kapaleshwar Temple Nashik : महादेवाच्या ‘या’ एकमेव मंदिरात नंदी नाही; ब्रह्मदेवाशी निगडित आहे रहस्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kapaleshwar Temple Nashik) आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ज्यांच्या आख्यायिका शतकांपासून सांगितल्या जात आहेत. यातील बरीच मंदिरे अत्यंत अद्भुत आणि अध्यात्माचा अनोखा वारसा लाभलेली आहेत. जिथे कायम भाविक मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने येताना दिसतात. देशभरात नाथांचे नाथ भोलेनाथांची अनेक पुरातन मंदिरे आहेत. तुम्ही पाहिले असेल की, जिथे महादेवाचे स्थान आहे तिथे मंदिरासमोर नंदीची प्रतिमा असते. पण आपल्या महाराष्ट्रात एक असे शिवमंदिर आहे, ज्यांच्यासमोर नंदीचा प्रतिमा नाही. चला या मंदिराबद्दल अधिक माहिती घेऊया.

कुठे आहे हे मंदिर? (Kapaleshwar Temple Nashik)

संपूर्ण जगभरात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. जिथे महादेव तिथे नंदी असा एक नियम आपण पाहिला असेल. मात्र महाराष्ट्रात नाशिकमध्ये पंचवटी परिसरात एक असे अद्भुत शिवमंदिर आहे जिथे नंदीची प्रतिमा उभारलेली दिसत नाही. जगभरातील हे असे एकमेव मंदिर आहे. जिथे महादेवाच्या मंदिरासमोर नंदी दिसत नाही. गोदावरी नदीच्या तिरावर वसलेले हे शिवमंदिर ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिथे नित्यनियमाने महादेवाची पूजा होते. मात्र, या मंदिरात नंदीचे दर्शन होत नाही.

काय सांगते आख्यायिका?

‘कपालेश्वर महादेव मंदिर’ या ऐतिहासिक मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ज्यानुसार, महादेवांना ब्रह्महत्येचे पातक लागले होते. ब्रह्मदेवाच्या चार मुखातून वेड मात्र पाचव्या मुखातून निंदा केली जात होती. (Kapaleshwar Temple Nashik) संतप्त महादेवांनी ब्रह्मदेवाचे पाचवे मुख उडवले आणि त्यांना ब्रह्महत्येचे पातक लागले. महादेवांनी या पातकापासुन स्व:ताची मुक्ती करुन घेण्यासाठी संपूर्ण त्रिभुवन पालथे घातले. मात्र, त्यांना हे पातक दूर कसे करावे ते समजत नव्हते. काही केल्या त्यांना लागलेले ब्रह्महत्येचे पातक दूर होत नव्हते आणि या पातकापासून आपली सुटका कशी होणार? याची त्यांना चिंता वाटू लागली.

अशावेळी आपल्या देवाच्या चिंतेचे निरसन करण्या हेतू नंदीने महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. या रामकुंडात गोदावरी आणि अरुणा संगमात महादेवांनी स्नान केले. ज्यामुळे महादेवांना लागलेले ब्रह्महत्येचे पातक दूर झाले आणि ते या दोषातून मुक्त झाले. (Kapaleshwar Temple Nashik) अत्यंत गंभीर परिस्थितीत ब्रह्महत्या दोष पातकाच्या संकटातून नंदीने आपली मुक्तता केल्याने महादेवांनी त्यास आपले गुरू मानले. त्यामुळे कपालेश्वर मंदिरात महादेवांसमोर नंदीची स्थापना केल्याचे दिसत नाही.

बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे मिळते पुण्य

या मंदिरात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. येथील लोकांच्या मान्यतेनुसार, जो भक्त पूर्ण श्रद्धा, आस्था आणि विश्वासाने या कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेईल त्याला बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळते. (Kapaleshwar Temple Nashik)