Sunday, March 26, 2023

सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; राज्यपालांच्या भूमिकेवरच ठेवलं बोट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गट आणि राज्यपालांना कोंडीत पकडले. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेतच बोट ठेवलं आहे. राज्यपालांनी थेट एकनाथ शिंदे यांना बहुमतासाठी आमंत्रण कस दिले असा सवाल करत राज्यपालांचे निर्णयच रद्द करण्याची मागणी केली आहे.

कपिल सिब्बल म्हणाले, सरकार पाडण्याचे षडयंत्र आधीच रचलं गेलं होत. राज्यपाल हे सरकार वाचवण्यासाठी असतात. राज्यपाल स्वत:हून सत्ताधाऱ्यांना बहुमत चाचणी करण्याची विनंती करू शकत नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला नव्हता, त्यामुळे राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना बहुमत सिध्द करायला कस काय बोलवलं असा सवाल करत हे सगळं चुकीचं आहे असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. शिवसेनेचं सरकार असताना शिवसेनेचे काही आमदार सरकार कसं पाडू शकतात? असाही प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

राज्यपालांनी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेसाठी बोलावलं. पण तोपर्यंत शिवसेना कोणती हे सुद्धा स्पष्ट झालं नव्हतं. हे सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. राज्यपालांनी दिलेला शपथविधी जर चुकीचा ठरला तर सरकारच जाईल असेही सिब्बल म्हणाले.