व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची ‘या’ दिवशी होणार घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना आता कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम दि. 27 मार्च रोजी जाहीर होणार असून या दिवशी निवडणुकीची घोषणा होणार आहे.

कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाणारी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक आहे. या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समिती ही गूळ, जनावरांच्या बाजारासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बाजार समितीने अन्य व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढविल्याने आता उलाढाल कोट्यवधीत गेली आहे. त्यामुळे ही बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी आता कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांकडून प्रयत्न केले जाऊ लागले आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ संचालक संख्या आहे. त्यामध्ये सोसायटी विभागातून ११, ग्रामपंचायत विभागातून ४, अडते व्यापारी विभागातून २ तर हमाल मापाडी विभागातून १ अशी एकूण १८ संचालक संख्या आहे. बाजार समितीत एकूण ४ हजार २०९ सभासद बजावणार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.