Karad News : यशवंत हायस्कूल ठरले नंबर वन; स्वच्छ सर्वेक्षण 2023 उपक्रमात पटकावला प्रथम क्रमांक

Yashwant Highschool karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : रयत शिक्षण संस्थेचे यशवंत हायस्कूल, कराड स्वच्छ सर्वेक्षण 2023 उपक्रमात नंबर वन ठरले आहे. कराड नगरपरिषदेमार्फत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यशवंत हायस्कूल, कराड यांचा पहिला नंबर आला आहे. कराड नगरपरिषदेकडून यशवंत हायस्कूलचा गौरव करण्यात आला.

यावेळी यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. डी.डी. पाटील सर यांचा कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रमाकांत डाके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कराड नगरपरिषदेने नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 हा उपक्रम आयोजित केला होता. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर टीळक हायस्कूल यांचा द्वितीय क्रमांक आला आहे.

कराड शहरातील एक अग्रगण्य अन् नंबर एक शाळा म्हणुन यशवंत हायस्कूलचा नावलौकीक आहे. आता गुणात्मक बाबतीसोबतच स्वच्छतेतही यशवंत हायस्कूल अव्वल ठरले आहे.