Satara News : पेट्रोल पंपाच्या पावतीवरून वनवसमाचीतील जळीत प्रकरणाचा लावला छडा; 3 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वनवसमाची हद्दीत एका मोरीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून हा खून आर्थिक वादातून केला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हि घटना पेट्रोल पंपाच्या पावतीवरून उलगडण्यात यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कराड येथे आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

मंजूनाथ सी. (वय 33, रा. अरेहाली पो. मायासंद्रा ता. अनेकल जि. बंगळूर, प्रशांत भिमसे बटवाल रा.अमनेळी ता. सिधगी जि.विजापूर राज्य कर्नाटक, शिवानंद भिमरायगोड बिरादार (वय २६, रा. तोरवी ता. तिकोटा जि. विजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यापैकी दोघांना आज पोलिसांनी हजर केले तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलीस अधीक्षक शेख यांनी दिलेली माहिती अशी की, तळबीड पोलीस ठाणे हद्दीत दि. २९/९/२०२३ रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमागील आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. तळबीड पोलीस ठाणेत दाखल असले गुन्हयाचे घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरुन व सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यावेळी त्यांना एका वाहनांची माहिती मिळाली. त्यांनी ज्या वाहनात इंधन भरले गेले त्या वाहनाची माहिती घेतली असता ते वाहन बंगळूर येथील असल्याचे समजले. त्यानंतर तळबीड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी आर. आर. वरोटे त्यांच्या पोलीस ठाणेचे कर्मचाऱ्यासह तपास कामी रवाना झाले.

त्यानंतर सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी प्रशांत बटवाल हा कारसह पुणे येथेच असल्याचे निष्पन्न झाले तर दुसरे पुणे येथे रवाना झालेल्या तपास पथकाने आरोपी प्रशांत बटवाल याला कारसह ताब्यात घेतले. नंतर बंगळूर येथील तपास पथकाने मुख्य आरोपी मंजुनाथ सी. यास बंगळूर येथे पकडून ताब्यात घेतले. त्याचवेळी आरोपी शिवानंद बिरादार हा विजापूर येथे असल्याची माहिती मिळाली. तेव्हा बंगळूर येथील तपास पथक परत विजापूर येथे जावून शिवानंद बिरादार यास ताब्यात घेतले. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून जाळून खून करण्यात आलेल्या पुरुषाकडून आरोपी मजुनाथ यांनी नोकरी लावण्याकरीता काही रक्कम घेतली होती.

ती रक्कम संबंधित व्यक्ती मंजूनाथ यास परत मागत होता. ती रक्कम मजुनाथ हा परत देत नव्हता म्हणून मयत पोलीसामध्ये तक्रार देण्यास जाणार असल्याचे समजलयानंतर मजुनाथ याने त्यास दिल्लीला जाऊन तेथे सही करुन येऊ, त्यानंतर तुला नोकरी देण्यात येईल, असे सांगून त्यास बोलावून घेतले. तसेच कारने आरोपी मंजूनाथ व प्रशांत बटवाल व शिवानंद बिरादार व मयत केशवामुर्ती असे दिल्लीला रवाना झाले. वाटेतच त्यांची कार हि कराड तालुक्यातील वनवासमाची गावच्या हद्दीत आली. या ठिकाणी संबधीत केशवमूर्ती याला पोत्यात गुंडाळून महामार्गालगतच्या नाल्यात पेट्रोल अंगावर टाकून त्यास जिवंत जाळून त्याचा खून केला.

अशी आहेत आरोपींची नावे

या प्रकारणी पोलिसांनी आरोपी मंजूनाथ सी. (वय 33, रा. अरेहाली पो. मायासंद्रा ता. अनेकल जि. बंगळूर, प्रशांत भिमसे बटवाल रा.अमनेळी ता. सिधगी जि.विजापूर राज्य कर्नाटक, शिवानंद भिमरायगोड बिरादार (वय 26, रा. तोरवी ता. तिकोटा जि. विजापूर यांना ताब्यात घेतले आहे.

कर्तव्यदक्ष ‘या’ पोलीस अधिकाऱ्यांकडून गुन्हा उघड

सदर प्रकरणी कराडचे DYSP अमोल ठाकूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. वरोटे यांचे तपास कामी योग्य मार्गदर्शनामुळे तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे वनवासमाची जळीत प्रकरणाचा तपास करण्यात आला. तसेच ४८ तासात या गुन्हयातील आरोपी निष्पन्न करण्यात व आरोपी ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पिसाळ, तळबीड पोलीस ठाणेचे पोहेकॉ आप्पा ओंबासे, पोना योगेश भोसले, पो.ना. काकासाहेब पाटील, पो.कॉ. निलेश विभुते, पो.को सनी दिक्षीत, पो.कॉ. प्रदिप पाटील, पोकों अभय मोरे पो. कॉ. प्रविण फडतरे, पो.हवा. शेडगे, पो.कॉ. प्रविण गायकवाड, संतोष सपाटे, सहा पोलीस फौजदार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांनी केली आहे. सदरचा गुन्हा ४ तासात उघडकीस आणणे कामी उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून पोलीस अधीक्षक सातारा यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.