कराड कोरोनाचे हाॅटस्पाॅट; आज पुन्हा ७ जण कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३३ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुका आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला आहे. सकाळी ५ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा नवे ७ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. सदर रुग्ण कोरोना बाधित असून त्य‍ांचे अहवाल पोझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक अमोद गडिकर यांनी दिली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे. यातील अर्ध्याहून अधिक म्हणजे तब्बल २२ रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यातील असल्याचे समजत आहे. यामुळे आता कराड तालुका हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, कराड तालुक्यासोबतच पाटण आणि जावळी तालुक्यांतही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने आज जिल्हाधिकाऱ्यांनी काही खबरदारीचे निर्णय घेतले आहेत. पाटण नगरपंचायत क्षेत्रासह आसपासची ५ गावे पुर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जावळी तालुक्यातील एकुण २८ गावे जिल्हाधिकाऱ्यांनी सील केली आहेत.