कराड-तासगाव महामार्गावरील कृष्णा पुल बनला धोकादायक; प्रशासनाचे दुर्लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । यावर्षी पावसाने संबंध राज्याला मनसोक्त झोडपून काढले. अगदी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत काही भागात पाऊस कोसळत होता. यामुळे केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनेचा भाग असणाऱ्या रस्ता दुरुस्तींच्या कामांवर मोठा परिणाम झाला. सध्या राज्यभर रस्त्यांची जोरदार कामे सुरु आहेत. ह्यामध्ये काही ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातांच्या बातम्या देखील समोर येतात. आता ह्यामध्येच कराड – तासगाव या मुख्य महामार्गावरील कार्वे गावानजीक असलेला कृष्णा पुल धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. या पुलावरील स्लॅबचा भाग सुटला असुन पुलाला देखील भगदाड पडले आहे. या पुलाच्या दोन गाळ्यांमध्ये मोठी फुट पडली असल्यामुळे पुलावरील अवजड वाहतुकीमुळे या ठिकाणी दुर्घटनेची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान दोन जिल्ह्यातील शहरांना जोडणाऱ्या कार्वे गावानजीक असणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. येथील गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासुन पुल दुरुस्ती ची मागणी केली आहे. तसेच या संबंधी वेळावेळी प्रशासनाला सूचना देखील दिल्या आहेत. मात्र एवढे करुनही या रस्त्यावरील पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. या महामार्गावरुन दररोज हजारो लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. मात्र आता पुलाची अशी दुरावस्था झाल्यामुळे प्रशासन या पुलामुळे मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न येथील रहिवाशी विचारात आहेत.