कराडला हाॅटेल अमित एक्झिक्युटिव्ह फर्मचा उद्या शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | येथील हाॅटेल अमित एक्झिक्युटिव्ह फर्मचा शुभारंभ उद्या रविवारी (दि. 4 डिसेंबर) सायंकाळी 6 वाजता होत आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुणे- बंगलोर महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील कोयना नदीपूलाजवळ सुसज्ज अशा या हाॅटेल शुभारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पटेल आहूजा परिवाराकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. कार्यक्रमास कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, माजी नगरसेवक सुभाष पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक साैरभ पाटील, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, माजी नगरसेवक फारूख पटवेकर, जयवंत पाटील, जेष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर, विक्रम पावसकर, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते साबिर मुल्ला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.