करण जोहरने व्यक्त केले ‘या’ अभिनेत्यावरील प्रेम; I Love U म्हणत शेअर केली खास पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगवरीलआपले प्रेम व्यक्त केले आहे.करण ने आपल्या इंस्टाग्रामवर रणवीर सिंगचा फोटो अपलोड करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्याने स्पष्टपणे लिहिले आहे की हा मार्केटिंग अजेंडा नाही, ही माझी भावना आहे, जी मी सर्वांसोबत शेअर करत आहे. मी रणवीर सिंगच्या प्रेमात पडलो आहे.

करण जोहर म्हणाला, माझ्या चित्रपटादरम्यान मी रणवीरला खूप जवळून पाहिले आहे. तो जितका गंभीर आहे तितकाच भावनिक माणूस आहे. एक कलाकार म्हणून तो जरा वेगळा आहे परंतु त्याच्या आतंरिक सौंदर्यावर मी भारावून गेलो आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या मी प्रेमात आहे”, असं म्हणत करणने म्हंटल. रणवीर ज्या प्रकारे सर्वांबद्दल प्रेम व्यक्त करतो ते खूप खास आहे. तो भेटणाऱ्या प्रत्येकाला खास वाटतो ही त्याची क्षमता खूप खास आहे… I Love U रणवीर अशी पोस्ट करण जोहरने केली आहे.

https://www.instagram.com/p/Cg4EPWuvr27/?igshid=YmMyMTA2M2Y=

दरम्यान, न्यूड फोटोशूट मुळे रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे. एका मासिकासाठी त्याने मागील महिन्यात न्यूड फोटोशूट केलं होतं त्यावरून बराच वाद झाला. अनेकांनी रणवीर वर टीकेची झोड उठवली तर काही जणांनी त्याला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, याप्रकरणी त्याच्यावर मुबंईत गुन्हा दाखल करण्यात आला होता.