करीना कपूर- करिष्मा कपूर राजकारणात येणार? मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून अनेक पक्षात नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेचे तिकीट दिले होते, त्यानंतर अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता बॉलीवूडच्या करीना कपूर- करिष्मा कपूर (Kareena Kapoor and Karishma Kapoor Meet Eknath Shinde) या भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला थेट वर्षावर गेल्याने चर्चाना उधाण आलं आहे. करीना कपूर आणि करिष्मा कपूर राजकारणात येणार का? याकडे लक्ष्य लागलं आहे.

करीना कपूर आणि करिश्मा कपूर या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. अभिनयासोबतच दोन्ही बहिणी त्यांच्या स्पष्टवक्ते शैलीसाठीही ओळखल्या जातात. आज अचानक या दोन्ही भगिनी वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चा जोर धरू लागल्या आहेत. या दोघी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त शिंदेंच्या (Eknath Shinde) भेटीसाठी गेल्या आहेत कि त्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत याबाबत माहिती समोर आलेली नाही. अजून तरी दोघींपैकी कोणीही राजकारणातील प्रवेशाबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

गोविंदाचा शिंदे सेनेत प्रवेश??

दरम्यान, बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा सुद्धा राजकारणात पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. आजच गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश होईल अशा चर्चा सुरु झाल्यात. गोविंदाने याआधी काँग्रेसकढून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि तो खासदारही झाला होता. आता गोविंदा पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी गोविदांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.