मुंबईतील BEST च्या गाड्यांवर कर्नाटकच्या जाहिराती; रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे मुंबईतील BEST बसवर कर्नाटक सरकारची जाहिरात पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खंत व्यक्त करत सरकारने विचार करायला हवा असा सल्ला दिला आहे.

कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नावरून मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा.असे ट्विट रोहीत पवार यांनी केलं.

दरम्यान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थी करणार आहेत. आज दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा होणार आहे. त्यामुळे अमित शहा नेमकी काय भूमिका घेतात? आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा विषय मिटणार का? याकडे दोन्ही राज्यांचे लक्ष्य असेल.