व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कर्नाटकाचा डोळा सोलापूर अक्क्लकोटवर; बोम्मईंच्या ट्विटने नव्या वादाला तोंड फुटणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केल्यांनतर कर्नाटकाचा डोळा आता सोलापूर आणि अक्कलकोट वर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याबाबत ट्विट करत महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोटे या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे असं आवाहन केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोटे या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे असं बोम्मई यांनी म्हंटल.

2004 पासून महाराष्ट्र सरकारने दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत यश आले नाही. यापुढे ते होणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.