‘या’ खेळाडूमुळे Rohit Sharma बनला सलामीवीर; टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रोहित शर्माला (Rohit Sharma) सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय यशस्वी ठरला आणि या निर्णयामुळे पुढे इतिहास घडला. मात्र धोनीने रोहितला (Rohit Sharma) सलामीला पाठवण्यामागे एका खेळाडूचा हात आहे. तो खेळाडू दुसरा कोणी नसून भारताचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक आहे.

काय घडले होते नेमके ?
2013 च्या चॅम्पियन्स चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीच्या सराव सामन्यात दिनेश कार्तिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 146 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे कार्तिकला फलंदाज म्हणून संघात कायम ठेवायचे होते. दिनेश कार्तिकला मधल्या फळीत ठेवण्यासाठी धोनीने रोहितला (Rohit Sharma) सलामीला पाठवले. धोनीचा हा निर्णय यशस्वी ठरला आणि पुढे इतिहास रचला गेला.

त्यावेळेचे टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी या बाबतीत खुलासा केला आहे. ‘2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीने निर्णय घेतला होता की रोहित डावाची सुरुवात करेल. सराव सामन्यात दिनेश कार्तिक चांगली फलंदाजी करीत होता, पण रोहितलाही (Rohit Sharma) संघात कायम ठेवायचे होते. त्यामुळे धोनीने हा निर्णय घेतला.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर