Kas Pathar : भारतातील निसर्गसंपन्नतेने नटलेला भाग म्हणजे उत्तराखंड, सुंदर डोंगरदऱ्या आणि उंच उंच झाडं तुमचे मन मोहून टाकतात तेथील आल्हाददायक वातावरण मन प्रफुल्लित करून टाकते यात शंका नाही. जुलै ते सप्टेंबर महिन्यात इथल्या डोंगरावर जाणून विविध रंगी फुलांची चादर पसरलेली असते. पण जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये वातावरण खराब असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील असे एक ठिकाण सांगणार आहोत जिथे तुम्ही असाच काही फील घेऊ शकाल. चला तर मग जाणून घेऊया नक्की कोणते आहे हे ठिकाण?
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल सांगत आहोत ते ठिकाण आहे महाराष्ट्रातलं ‘कास पठार’ (Kas Pathar) हे पठार महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात आहे. जवळपास 24 किलोमीटर वर हे कास पठार पसरलेले असून महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त आकर्षक अशा पर्यटन स्थळांपैकी एक हे कास पठार आहे.
जागतिक वारसा स्थळाच्या यादीत कास पठार
2012 साली युनिस्को च्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत कास पठाराचा (Kas Pathar) समावेश करण्यात आला. कास पठार बाराशे मीटर उंचीवर आहे. पाऊस पडून गेल्यानंतर हे ठिकाण अधिक मनमोहक होऊन जाते आणि वेगवेगळ्या फुलांची चादर या पठारावर पसरली जाते. कास पठारावर जवळपास 850 प्रकारची फुलं सापडतात. याच्याशिवाय इथे ऑर्किड, स्मिथिया, सेरो पेजिया यासारखे दुर्मिळ फुलं सुद्धा सापडतात. तुम्ही जर या ठिकाणाला भेट दिली तर आवर्जून हे निसर्ग सौंदर्य तुमच्या कॅमेरा मध्ये सामावून घ्यायला विसरू नका.
कास तलाव (Kas Pathar)
कास पठार वरील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कास तलाव. कास पठारापासून जवळच असलेला हा तलाव अतिशय प्रसिद्ध असून पावसाळ्यामध्ये या कास पठार आणि कास तलावाचं निसर्ग सौंदर्य अधिक फुलून येतं. पावसाळ्यात या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका.
कसे पोहचाल ?
- विमानाने: जर तुम्हाला येथे विमानाने यायचे असेल तर सर्वात जवळचे विमानतळ (Kas Pathar) पुणे आहे. पुणे विमानतळावरून तुम्ही बस किंवा टॅक्सीने कासला पोहोचू शकता.
- ट्रेनने: ट्रेनने येण्यासाठी तुम्हाला सातारा रेल्वे स्टेशनला यावे लागेल. स्थानकापासून कासचे अंतर फक्त 30 किमी आहे. च्या अंतरावर. साताऱ्याला गेल्यावर बस किंवा टॅक्सीने कास पठारावर (Kas Pathar) पोहोचता येते.
- रस्त्याने: जर तुम्हाला इथे रस्त्याने यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की मुंबई किंवा पुण्याहून इथे पोहोचायला ३ ते ५ तास लागू शकतात.