Kas Pathar : पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपलं रूप बदलायला लागतो. धरणी हिरवीगार शाल पांघरते तर डोंगरांमधून धबधबे प्रवाहित व्हायला लागतात. राज्यभरात आता काहीशी पावसानं उसंत घेतल्यामुळे निसर्गाचं हे अनमोल रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनेक पर्यटक विविध ठिकाणांना भेटी देत असतात. असंच एक सुंदर ठिकाण म्हणजे ‘ कास पठार’ सातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे. थंडगार वारा, दात धुकं , आणि अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरी याबरोबरच विविध प्रकारच्या फुलांचे गालिचे हे इथलं वैशिष्ट्य. हे ठिकाण काही साधं ठिकाण नाही तर जागतिक वारसा स्थान असून विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. पाऊस पडून गेल्यानंतर हळूहळू इथं फुलं उमलायला (Kas Pathar) सुरू होतात.
कास परिसरात सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडूत असून दाट धुके, रिमझिम पाऊस आणि गार वारा असं मस्त वातावरण आहे. त्यामुळे वीकेंडला पर्यटकांची इथं गर्दी होत असून इथे हळूहळू आता विविध रंगांची फुलं उमलायला सुरुवात झाली आहे.
कसे कराल बुकिंग? (Kas Pathar)
कास पठाराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर http://www.Kas.ind.in या वेबसाईटवर बुकिंग करणं गरजेचं आहे. तसंच जास्तीत जास्त ऑनलाइन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार असून पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करून जावे.
कास पठार साताऱ्यापासून 25 किलोमीटर, महाबळेश्वर पासून 37 किलोमीटर आणि पाचगणी पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. इथं फुलांच्या 800 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. तर हे पठार तब्बल 1000 हेक्टर क्षेत्रामध्ये (Kas Pathar) पसरलेले आहे.
फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ (Kas Pathar)
कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदांसमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले. त्यातलं कास हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक (Kas Pathar) वारसा स्थळ आहे.