कास- यवतेश्वरला फिरायला गेलेल्या काॅलेजच्या युवतीचा अपहरणाचा बनाव उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील एक कॉलेजमधील अल्पवयीन युवती सोमवारी आपल्या पालकांसोबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आली होती. तिने वाय. सी. कॉलेज ते पेंढारकर हॉस्पीटल मार्गावर दुपारी 3:45 वा. सुमारास अपहरण करण्याचे उद्देशाने एका पांढऱ्या रंगाच्या ओमनी वाहनातील पाठीमागे बसलेल्या अनोळखी बुरखाधारी व्यक्तीने तिच्या दंडास ओढून गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले होते. सदरची बाब गंभीर स्वरूपाची असल्याने युवतीकडे महिला पोलीस अधिकारी यांनी चौकशी केली. मात्र, सदरील प्रकार युवतीने रचलेला बनाव असल्याचे समोर आला आहे. संबंधित युवती कॉलेज संपल्यानंतर फिरण्यासाठी यवतेश्वर-कास रोडला गेली होती, तेथून घरी परतण्यास जाण्यास वेळ लागल्याने हा बनाव युवतीने रचला होता.

सोमवारी दि. 10/10/2022 रोजी दुपारी 4:30 वा. सुमारास एक कॉलेजमधील अल्पवयीन युवती हि तिचे पालकांसोबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे आली होती. तिने तिस वाय. सी. कॉलेज ते पेंढारकर हॉस्पीटल जाणाऱ्या रोडवर अनोळखी बुरखाधारी व्यक्तीने युवतीच्या दंडास ओढून गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले होते. सदरची बाबीची युवतीकडे महिला पोलीस अधिकारी यांनी चौकशी केली. त्याच दरम्यान डी. बी. पथकास सदर घटनेची माहिती देवून तात्काळ पाचारण करण्यात आले. सदर ठिकाणी डी. बी. पथकाने घटनास्थळी जावून पाहणी करून सदर ठिकाणी असणारे व्यवसायिक लोकांकडे चौकशी केली. परंतू सदरचा प्रकार कोणी समक्ष पाहिला व ऐकला नसल्याचे सांगितले.

सदर प्रकरणाबाबत सोशल मिडीयावर अज्ञात बुरखाधारी लोकांकडून अपहरण झाले असल्याबाबतची माहिती सातारा शहरामध्ये व्हायरल झाली होती. जनमानसामध्ये, कॉलेज युवती, शाळकरी मुले तसेच पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी होत असताना धक्कादायक माहिती समोर आली की, संबंधित युवती कॉलेज संपल्यानंतर फिरण्यासाठी यवतेश्वर-कास रोडला गेली होती. तिला नेहमी पेक्षा घरी जाण्यास वेळ झाला. याकारणाने घरातील लोक ओरडतील या भितीने तिने अनोळखी बुरखाधारी व्यक्तिने अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिचे पालकांना तसेच पोलीस ठाणेस सांगितले होते. परंतू पोलीस चौकशीमध्ये सदरचा प्रकार हा बनाव केला असल्याचे समजून आले.

बुरखाधारी व्यक्ती कोणीही नाही, अफवा फसरविणाऱ्यावर कारवाई होणार
तरी सातारा शहर तसेच परिसरातील जनतेस सातारा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की, असे बुरखाधारी व्यक्ती कोणीही नाही, मुले पळवणारी टोळी सुद्धा नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जे काही व्हिडिओ व्हायरल होतात ते खोटे आहेत. आपल्याला काही शंका आल्यास तात्काळ सातारा कंट्रोल नं. 112 वर संपर्क करावा. परंतू विनाकारण कोणावरही संशय घेवून मारहाण करू नये. अन्यथा आपल्यावरच कारवाई केली जाईल. तरी अफवांवर विश्वास ठेवू नये.