500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून काश्मिरी व्यक्तीने केला विश्वविक्रम, सोशल मीडियावर Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही लोक आपल्या पराक्रमाने अनेक विश्वविक्रम करत असतात. काश्मीरमधील अशाच एका व्यक्तीने आपल्या निष्ठेने एक अनोखा पराक्रम केला आहे. त्याने 500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून (man writes quran on 500 meter long paper) जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे त्या काश्मीरी व्यक्तीची सर्वत्र चर्चा होत आहे. तेव्हापासून लोकांनी त्याचं सोशल मीडियावर कौतुक करायला सुरुवात केली आहे. या व्यक्तीचे वय 27 वर्ष असून इतक्या लहान वयामध्ये त्याने हि कामगिरी (man writes quran on 500 meter long paper) केलेली पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
काश्मीरमधील बांदीपोरा येथे राहणाऱ्या 27 वर्षीय मुस्तफा-इब्न-जमीलने एक अनोखा विक्रम केला आहे. अथक परिश्रमाने स्वतःचे आणि देशाचे नाव रोशन करून त्यांनी विश्वविक्रम (man writes quran on 500 meter long paper) केला आहे. मुस्तफाने 500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून (man writes quran on 500 meter long paper) हा विक्रम केला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

मुस्तफा हा कॅलिग्राफर असून त्याने हे काम 7 महिन्यांत पूर्ण केले आहे. लिंकन बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांचा हा पराक्रम (man writes quran on 500 meter long paper) जागतिक विक्रम मानला आहे. तसेच त्यासाठी त्यांना बक्षीसही दिले आहे. मुस्तफाने 14.5 इंच रुंद आणि 500 ​​मीटर लांब कागदावर कुराण लिहिले आहे. इतकंच नाही तर ट्विटर व्हिडिओनुसार, तो रोज 18 तास कागदावर कुराण लिहायचा.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर