धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची ब्रँड ॲम्बेसेडर बनली कॅटरिना कैफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा म्हंटल जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL कडे क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. त्यातच आता आयपीएल सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्टनुसार, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) हिची चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी निवड होऊ शकते. असं झाल्यास चेन्नईच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये आणखी भर पडेल. खरं तर महेंद्रसिंघ धोनीमुळे चेन्नईचे जगभरात करोडो चाहते आहेत, आता त्यात कतरीनाची भर पडल्याने चेन्नईच्या चाहत्यांची सांख्य आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र कतरिनाच्या नियुक्तीवर CSK ने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.

बॉलिवूड क्वीन कतरिना कैफ ही यूएईची राष्ट्रीय विमान कंपनी इतिहाद एअरवेजची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. कतरिनाने 2023 मध्ये इतिहाद एअरवेज जॉईन केली. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जने इतिहाद एअरवेजसोबत प्रायोजकत्व करार केला आहे. यासोबतच CSK ने कतरिना कैफलाही आपली ब्रँड ॲम्बेसेडर बनवली आहे. कतरीना चेन्नईची ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याने महेंद्रसिंघ धोनी + कतरीना कैफ असे २ दिग्गज व्यक्ती चेन्नईच्या ब्रँड व्हॅल्यू मध्ये मोठी भर घालतील.

आयपीएल मधील यशस्वी संघ आहे चेन्नई –

महेंद्रसिग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखालील चेन्नईचा संघ हा आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. चेन्नईने आयपीएलच्या चौदा हंगामात बारा वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे आणि तब्बल ५ आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. महेंद्रसिंघ धोनीची उपस्थिती हि संघासाठी नेहमीच जमेची बाजू मानली जाते. आताही चेन्नईच्या ताफ्यात महेंद्रसिंघ धोनीसह शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र आणि मुस्तफिझूर रहमान यांसारखे तगडे खेळाडू आहेत. त्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकणार का याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलं आहे.