Kawasaki Bike : ‘या’ बाइकवर मिळत आहे 35 हजाराची सूट; ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2022 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्ल्क राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन वर्ष सुरु होयच्या अगोदर जर नवीन बाईक घेण्याचा (Kawasaki Bike) विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला आज अशा बाइकबद्दल (Kawasaki Bike) सांगणार आहोत त्याला तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. कंपनी कावासाकी निंजा (Kawasaki Bike) 300 वर 10 हजार रुपयाचा डिस्काउंट देत आहे. तर कावासाकी झेड 650 वर 35 हजार रुपयाचा डिस्काउंट देत आहे. कंपनीने कावासाकी निंजा 300 ला यावर्षी एप्रिल मध्ये 3.37 लाखमध्ये लॉंच केले होते. यानंतर या बाइकच्या किंमतीत 3 हजार रुपयाची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे या बाईकची एक्स शोरूम किंमत 3.40 लाख रुपये आहे.

काय आहे संपूर्ण ऑफर ?
कावासाकी (Kawasaki Bike) इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वर कावासाकी निंजा 300 आणि कावासाकी झेड 650 बाईकवर मिळणाऱ्या ऑफरची संपूर्ण अधिकृत माहिती दिली आहे. ऑफरच्या माहितीनुसार, ग्राहकांना कावासाकी निंजा 300 वर 10 हजार रुपये आणि कावासाकी झेड 650 वर 35 हजार रुपयाची सूट दिली जात आहे. ही ऑफर 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत असणार आहे. ग्राहक दोन्ही बाईक कावासाकी डीलरशीप वर जावून बुक करू शकतात.

कावासाकी निंजा 300 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कावासाकी निंजा 300 मध्ये 296 सीसीचे पॅरेलल ट्विन, लिक्विड कूल्ड, 4 स्ट्रोक, फ्यूएल इंजेक्टेड इंजिन मिळते. हे इंजिन 11,000आरपीएमवर 38.4 बीएचपीचे पॉवर आणि 10 हजार आरपीएमवर 26.1 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 6 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्सशी जोडले आहे. बाइकमध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिले आहे. यात 37 एमएम टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स दिले आहे. ब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये (Kawasaki Bike) ड्युअल चॅनेल एबीएस सोबत दोन्ही व्हीलवर पेडल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

कावासाकी झेड 650 चे फीचर्स
कावासाकी झेड 650 मध्ये 649 सीसी पॅरेलल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 8 हजार आरपीएमवर 67 बीएचपी चे पॉवर आणि 6700 आरपीएमवर 64 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी बाइक मध्ये 6 स्पीड गियरबॉक्सशी जोडले आहे. बाइकमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक सोबत अँटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. या बाइकचे वजन 191 किलो असून 15 लीटरची फ्यूल टँक दिली आहे. या बाइकची (Kawasaki Bike) एक्स शोरूम किंमत 6.43 लाख रुपये आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय