जंगलात गुहेच्या आत आहे महाराष्ट्रातील रहस्यमय मंदिर ; फक्त एका खांबावर उभे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक तरुण मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील उत्तराखंडामधील केदारनाथचे मंदिर आकर्षण आहे. उत्तराखंडमधील केदारनाथचे मंदिर पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. परंतु महाराष्ट्रात देखील असे एक रहस्यमय मंदिर आहे. जे गुहेच्या आत दडलेले आहे. या मंदिराला केदारेश्वर गुहा मंदिर असे नाव देण्यात आलेले आहे. परंतु तुम्हाला जर या मंदिरात जायचे असेल, तर कमरेपर्यंत पाणी आहे. हे शिवलिंग पाण्यात आहे. परंतु हे पाणी अत्यंत थंड असते. त्यामुळे त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे. आता आपण या रहस्यमय मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील हे मंदिर अत्यंत घनदाट जंगलात आहे. हे मंदिर गुहेच्या आत आहे. तसेच एकाच खांबावर उभे आहे. मंदिरात मधोमध शिवलिंग आहे. आणि शिवलिंगाच्या संपूर्ण बाजूंनी कमरेपर्यंत पाणी आहे. त्यामुळे सहसा या ठिकाणी जाणे लोकांना शक्य होत नाही. मंदिराच्या आत पाच फुटापर्यंत पाणी आहे. हे मंदिर मळगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र या नदीच्या काठावर वसलेले आहे.

हे नदीचे पाणी थेट मंदिरात शिरते. मंदिराचे प्रवेशद्वार अरुंद असल्याने गुहेमध्ये सर्वत्र पाणी पसरते. तसेच या गुहेत स्वयंप्रकट असलेले शिवलिंग आहे. हे मंदिर सुरुवातीला चार खांबांवर उभे होते. परंतु त्यातील तीन खांब तुटले आहेत. आणि हे मंदिर सध्या एकाच खांबावर उभे राहिलेले आहे.

हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पूर्व रांगेत असलेल्या हरिश्चंद्रगडावर आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसर पूर्ण निसर्ग रम्य आहे. परंतु हे मंदिरात अत्यंत घनदाट जंगलात आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागतो. मंदिरात असलेल्या या चार खांबांचा एक अर्थ देखील आहे. सत्य त्रेता, द्वापार आणि कलियुग या चार युगांचे प्रतीक म्हणून हे चार खांब आहेत. परंतु या चार खांबांपैकी सध्या एकच खांब उभा आहे. आणि जर या मंदिरातील तो एक खांब पडला, तर या जगाचा नाश होईल अशी धारणा आहे. महाराष्ट्रातील हे एक असे एकमेव मंदिर आहे. तिथे जगाच्या विनाशाचे संकेत देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी अनेक लोक भेट देतात. जर तुम्हाला महाराष्ट्रातील केदारनाथ मंदिराचे दर्शन घ्यायचे असेल, तर तुम्ही या ठिकाणी नक्की जाऊ शकता.