Kedarnath Landslide : केदारनाथमध्ये दरड कोसळली; महाराष्ट्रातील 2 भाविकांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केदारनाथमधून (Kedarnath News) एक मोठी बातमी समर येत आहे. गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत. यातील २ भाविक हे महाराष्ट्रातील आहेत. आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून भाविकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की केदारनाथ यात्रा मार्गावर दरड (Kedarnath Landslide) कोसळली. यात्रेकरू गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर केदारनाथच्या दर्शनासाठी जात होते. परंतु अचानक चिरबासाजवळील टेकडीचा काही भाग खचला आणि दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक यात्रेकरू जमिनीखाली गाडले गेले. माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर, वायएमएफची पथके घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने ढिगाऱ्यातून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. बाकी आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत मृत पावलेल्या भाविकांमधील २ भाविक हे महाराष्ट्रातील आहेत. किशोर अरुण पराते (३१, रा. नागपूर महाराष्ट्र), आणि सुनील महादेव काळे (२४, रा. जालना महाराष्ट्र) अशी या दोन्ही भाविकांची नावे आहेत. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातारण तयार झाले आहे. दरम्यान, गौरीकुंड ते केदारनाथ असा १६ किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. याठिकाणी सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत असतात. खास करून पावसाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असते. मागच्या वर्षी अशाच प्रकारच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच हा मार्ग जोखमीचा म्हटला जातो.