Kerala Tour Packages : स्वस्तात घ्या केरळच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद; IRCTC ने आणलं खास पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kerala Tour Packages । केरळ हे भारताच्या दक्षिण टोकाला असलेले निसर्गरम्य राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. पृथ्वीवरील स्वर्ग किंवा देवभूमी असा केरळचा उल्लेख केला जातो. त्यामुळे दरवर्षी देशभरातू पर्यटक केरळची सैर करतात आणि तेथील निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असतात. तुम्ही सुद्धा यंदाच्या या नव्हता वर्षात केरळला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला IRCTC च्या स्वस्तात मस्त टूर पॅकेजबाबत सांगणार आहोत.

Amazing Kerala Ex Pune असे या केरळ टूर पॅकेजचे नाव आहे. IRCTC ची टूर पुण्यातून सुरु होईल. हा संपूर्ण प्रवास 5 दिवसांचा असेल. तुम्हाला या यात्रेत जेवणाची आणि राहण्याची सोय IRCTC कडून केली जाणार आहे . या पॅकेजमध्ये तुम्ही मुन्नार ते कोची, थेक्कडी, कुमारकोम येथे जाऊ शकता. पुणे- कोची हा प्रवास हवाईमार्गाने करण्याची सोय या पॅकेजमध्ये नमूद करण्यात आली आहे. या पॅकेजनुसार (Kerala Tour Packages) तुम्ही थ्री-स्टार हॉटेलमध्ये हॉटेल रूम शेअर किंवा नॉन शेअर करून राहू शकता. तुम्हाला केरळमध्ये गेल्यानंतर अलेप्पी किंवा कुमारकोममध्ये क्रूझचीही सोय अनुभवण्यास मिळणार आहे. IRCTC च्या पॅकेजनुसार ज्यांचे वय कमाल 60 वर्षे आहे, त्या पर्यटकांसाठी प्रवाशी विम्याची सोयही उपलब्ध केली गेली आहे.

किती आहे खर्च – Kerala Tour Packages

10 फेब्रुवारी 2024 रोजी ‘Amazing Kerala Ex Pune’ अॅमेझिंग केरला प्रवास यात्रेची सुरुवात पुणे एअरपोर्ट वरून सकाळी हवाईमार्गे सुरु होत आहे. प्रौढ प्रवाश्यांना कन्फर्ट क्लाससाठी श्रेणीनुसार किमान 39,400 रुपये प्रति व्यक्ती खर्च येणार आहे. तर 5 – 11 वयोगटातील मुलांसाठी 31 ते 36,500 रुपये प्रति व्यक्ती खर्च येणार आहे. IRCTC च्या पॅकेजमध्ये पर्यटक केरळमधील समुद्र किनारा, उंच पर्वत, जंगल सफारी, चहा व कॉफीचे मळे आणि निसर्गसंपन्न सौंदर्याचं अनुभव लुटणार आहेत.