Thursday, February 2, 2023

केसे पाणी पुरवठा संस्था निवडणूक : अटीतटीच्या लढतीत सत्ताधाऱ्यांना चिठ्ठीने दिली सत्ता, काका- बाबा गटाला धक्का

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
तालुक्यातील केसे येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची झाली. अटीतटीच्या या लढतीत सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवारांना एका- एका मताने विजय- पराभव अनेकांना पहायला मिळाला. चार तास चाललेली अन् दोन वेळा फेर मतमोजणी घेण्यात आली. तर चिट्टीच्या साथीने व नशिबाने साथ दिल्याने सत्ताधारी गटाला सत्ता राखण्यात यश आले.

भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेच्या निवडणूकीमुळे वारूंजी पंचक्रोशीतील राजकारण चांगलेच तापले होते. स्व. विलासराव पाटील (काका) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या विरोधी गटाला 8 जागा मिळवता आल्या. तर सत्ताधारी गटाला 8 जागेवर निर्विवाद तर एका जागेवर चिट्टीने विजय मिळाला. त्यामुळे 17 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत संमिश्र सत्ताधारी पॅनेलला 9 तर विरोधी काका- बाबा गटाला 8 जागांवर समाधान मानावे लागले. काठावर पास अशी झालेल्या या लढतीत विजयानंतर कोणताही जल्लोष करण्यात आला नाही.

- Advertisement -

भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेत एकूण 1400 सभासद असून त्यातील 912 सभासद मतदानास पात्र होते. केसे गावासह वारूंजी, गोटे, मुंढे, सुपने, पाडळी व कराड शहरातही काही मतदार आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील गावा- गावात या निवडणुकीची एकच चर्चा सुरू होती. सत्ताधारी श्री. भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलचे पंजाबराव पाटील, दाजी जमाले, विनायक शिंदे यांनी नेतृत्व केले. तर विरोधी श्री. भैरवनाथ परिवर्तन विकास पॅनेलचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी केले.

चिठ्ठीने दोघांचे नशिब बदलले
अटीतटीच्या निवडणुकीत दोन जणांचे नशीब चिट्टीने बदलले. यामध्ये एक जागेवर सत्ताधाऱ्यांना तर एका जागेवर विरोधकांना चिट्टीने साथ दिली. सर्वसाधारण गटात राजेंद्र श्रीरंग पाटील आणि जगदीश जयवंत पाटील या दोघांना सम-समान 353 मते पडली. यामध्ये विरोधी गटाचे जगदीश जयवंत पाटील- वारूंजी हे चिट्टीने विजयी होईल. तर इतर राखीव मतदार संघातून लालासो बाळकू सुतार आणि शब्बीर तुराब मुजावर यांच्यात लढत झाली. त्यामध्ये 369 सम- समान मते पडली. यामध्ये सत्ताधारी गटाचे शब्बीर तुराब मुजावर- पाडळी- सुपने हे चिट्टीने विजयी झाले.

सत्ताधारी श्री. भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलमधील विजयी उमेदवार नांव, गाव व कंसात मते ः- आनंदराव जागरू जमाले- केसे (356), चंद्रकांत दाजी पाटील (368), पंजाबराव विठ्ठलराव पाटील- वारूंजी (383), प्रकाश राजाराम पाटील- वारूंजी (370), सिद्धेश्वर हरिशचंद्र पाटील- वारूंजी (382), महेश प्रल्हाद शिंदे- केसे (357), विनायकराव गोविंदराव शिंदे- केसे (357), आशाताई भास्कर धुमाळ- वारूंजी (367), शब्बीर तुराब मुजावर- पाडळी- सुपने (369- चिट्टीने विजयी).

विरोधी श्री. भैरवनाथ परिवर्तन विकास पॅनेलमधील विजयी उमेदवार नांव, गाव व कंसात मते ः- दाजी (आबा) गणपती जमाले- मुंढे (355), तानाजी विष्णू देशमुख- वारूंजी (370), जगदीश जयवंत पाटील- वारूंजी (353- चिट्टीने विजयी), रणजीत रविंद्र पाटील- वारूंजी (372), सर्जेराव भास्कर पाटील- वारूंजी (359), सुनंदा नामदेव पाटील- वारूंजी (402), शिवाजी महादेव लोंढे- मुंढे (388), दिनकर नाना येडगे- मुंढे (385),